100+ Short Story in Marathi with Moral for Children’s

Short story in Marathi with moral for children’s: लहान मुलांना कहाणी ऐकायला खूप आवडते. गोष्टी ऐकण्यासाठी त्यांचा जीव नेहमी आतुर झालेला असतो. तुम्हाला हे माहीत असेल की प्रत्येक लहान मुलगा नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी ते आपल्या आईवडिलांकडे,आजी-आजोबांकडे नेहमी मागणी करत असतो.

या गोष्टींमधून त्याला नवीन नवीन प्रेरणा मिळते. कमी वयात जर त्याने चांगल्या गोष्टी ऐकल्या आणि त्यातून जर त्यांनी चांगले ज्ञान घेतले तर त्याचा फायदा त्याला पुढील आयुष्यात नक्कीच होतो. आम्ही आज तुम्हाला अशाच शॉर्ट स्टोरी (Short Story) सांगणार आहोत, ज्या ऐकून तुमच्या मुलांना नक्कीच कोणता तरी बोध मिळेल.

या लेखामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान हे नक्कीच या लेखातून भेटेल अशी मी अपेक्षा करतो. मी तुमच्या पुढे मराठी गोष्टी याच्या मधून तुम्हाला काहीतरी बोध मिळेल असे सादर करतो.

Marathi short Stories: (Short story in Marathi with moral)

Short Story in Marathi with Moral for Children's

मला कदाचित माहीत नसेल परंतु आपले आजी आजोबा जेव्हा लहानपणी आपल्याला या गोष्टी सांगायचे. तेव्हा लहान मुले आवडीने त्या गोष्टी ऐकायची. आपल्या जीवनात त्या गोष्टी आत्मसात करायचे. तर चला कोणती गोष्टीची सुरुवात लवकर केली पाहिजे.

या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला Short inspirational stories in marathi, Short motivational stories in marathi, short moral stories in marathi सादर करणार आहोत. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील.

कुत्रा आणि मटणाचे हाडूक –

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक कुत्रा राहत होता. कुत्रा हा बेवारस असल्याने त्याला जेवण व्यवस्थित मिळत नव्हते. एक दिवस त्याला खूप भूक लागली होती. त्याला समोर एक मटणाचा तुकडा म्हणजेच मटणाचे हाडूक दिसले.

कुत्र्याने ते आपल्या दातामध्ये धरून तो ते खाण्यासाठी एका निवांत जागी बसण्यासाठी निघाला. रस्त्यातून जात असताना त्याला एक नदी लागली. नदी पार करत असताना त्याला समोर एक कुत्रा दिसला. त्याच्या पण तोंडामध्ये एक मटणाचे हाडुक होते.

हा कुत्रा लालची असल्यामुळे त्यालाही वाटली की समोरचा कुत्र्याच्या तोंडातील मटणाची हाडून आपल्याला मिळावे. यासाठी त्याने आपला जबडा उघडला. त्याच्या तोंडातील मटणाचे खडकाचा तुकडा नदीमध्ये पडला आणि तो वाहून गेला.

कुत्र्याला काहीच समजत नव्हते, कारण नदीमध्ये असणारे कुत्रे दुसरा कोणी नसून त्याचे प्रतिबिंब होते. आता त्याच्या देखील तोंडामध्ये मटणाची हाडून त्याला दिसत नव्हते. या लालचाच्या पोटी कुत्रा या दिवशी उपाशी राहिला.

शिक्षा: अति लोभीपणा करणे मी बरे नाही. याच बरोबर दुसऱ्यावर ईर्षा करणे हेदेखील बरोबर नाही.

मुंगी आणि हत्तीची कहाणी:

ही कहाणी तर सर्वांनी वाचलेली असेल. तरी पण आम्ही काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. एका जंगलामध्ये एक हत्ती होता. तो इतर लहान प्राण्यांना खूप त्रास देत असे, तो विनाकारण झाडांची नासधूस करत असे. विनाकारण लहान प्राण्यांना मारहाण करत असेल.

एके दिवशी असाच हत्ती स्वतःच्या ताकतीचा गर्व बाळगून एक झाडू उपटण्यासाठी निघाला. त्या झाडाच्या मुळामध्ये मुंग्यांचे वारूळ होते. मुंग्या आनंदाने त्या वारुळात राहत होत्या. मुंग्यांनी हत्तीला विनवणी केली की, तू ते वारूळ वाचव. झाडू उपटू नकोस.

परंतु हत्तीने काही त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तो झाड उपडण्यासाठी निघाला. मुंग्याना समजताच त्यातील काही मुंग्या आपल्या वारुळाचे रक्षण करण्यासाठी हत्तीच्या सोंडेमध्ये शिरल्या. त्यांनी सोंडेमध्ये जाऊन चावा घेतला.

हत्तीला काही सुचेना त्याला खूप त्रास होऊ लागला. मुंग्यांना त्याने विनाकारण त्रास दिला होता. याची त्याला जाणीव झाली. त्याचबरोबर त्याने पुढील जीवनात सर्व प्राण्यांना त्रास देणार नाही अशी कबुली देखील केली.

तात्पर्य: आयुष्यात आपल्याला विनम्र होऊन जगता आलं पाहिजे. सगळ्यांची एकजूट राहून कोणालाही त्रास न देता, आपला स्वार्थ न बघता आपण आपल्या बरोबरच इतरांनाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वेळ आली तर आपण त्यांचे रक्षण देखील केले पाहिजे.

20+ Akbar Birbal Story in Marathi with Moral

मुंगी आणि कबूतर यांची कहाणी गोष्ट

एका जंगलामध्ये मुंगी आणि कबूतर राहत होते. एके दिवशी मुंगीला खूप तहान लागली होती. ती नदीमध्ये पाणी पिण्यासाठी निघाली होती. मुंगीच्या दगडावरून पाणी पिण्यासाठी नदीमध्ये उतरत होती, तो दगड पाण्यामध्ये पडला. मुंगी नदीमध्ये वाहू लागली.

मुंगी वाहत जाताना पाहून वरील झाडावर बसलेले कबुतराला वाटले की, आपण मुंगीचे रक्षण केले पाहिजे. त्याने लगेच झाडावरील एक पान तोडून खाली नदीमध्ये फेकून दिले. मुंगी त्या पानावर बसली आणि किनार्यालगत आली. कबुतराने आपल्या हुशारीने मुंगीचा जीव वाचवला. मुंगी आणि कबूतर एक चांगले दोस्त झाले.

कबुतराने मुंगीचा वाचवला जीव याबद्दल मुंगी त्यांची सदैव ऋणी होती. एके दिवशी ते दोघे बसलेले असताना जंगलामध्ये एक शिकारी आला. शिकाऱ्याला पाहून कबूतर लगेच झाडाच्या शेंड्यामध्ये जाऊन बसले.

शिकारी झाडापाशी आला आणि त्याने आपल्या बंदुकीने कबूतरावर्ती नेम धरला. कबूतरावर्ती धरलेला नेम बघून मुंगी थोडी घाबरली. तिला वाटले कबुतराचा जीव डोक्यामध्ये आहे. आपण काहीतरी केले पाहिजे. ती हळूहळू शिकारीपाशी गेली.

तिने त्याच्या पायाचा चावा घेतला. अचानक घेतलेल्या चाव्यामुळे शिकारी ओरडला कबूतर हेदेखील सावध झाले. कबुतर तेथून निघून गेले. अशाप्रकारे मुंगीने आपल्या हुशारीने तो त्याचा जीव वाचवला.

तात्पर्य: आपण जीवनात दुसऱ्यांचे चांगले केले तर आपल्याही जीवनात नक्की चांगलेच होते.

जादूची छडी:

एका गावामध्ये श्याम नावाचा व्यक्ती मुलगा राहत होता. एके दिवशी तो एका झाडाखाली खेळत असताना त्याला एक छडी सापडली. छडी त्याच्याशी बोलू लागली. छडीने त्याला सांगितले की, मी जादूची छडी आहे. तू माझ्याकडून कोणतेही वरदान मागू शकतोस. मी तुझे वरदान नक्कीच पूर्ण करेल. परंतु तुला एकच वरदान मागायचे आहे.

श्याम विचारात पडला. त्याने सांगितले की मी काही दिवस विचार करतो आणि नंतर वरदान मागतो. श्याम वरदान मागायचे विसरतो. एके दिवशी श्याम त्याच्या मित्रावर खेळत असताना त्याच्या मित्राने त्याच्या दप्तरातून छडी बाहेर काढली आणि चोरून तो त्याच्या घरी घेऊन गेला.

त्यांनी वरदान मागितले की आम्हाला सोने चांदी आणि महल मिळावा. मित्रांची दशा पूर्णपणे बदलली गेली .पुढील काही दिवसांत त्यांचा मित्र पणा राहिला नाही. त्यांच्याकडे पैसा श्रीमंती आली परंतु त्यांच्या जीवनातील आनंद हिरावून गेला.

ते या जीवनाला कंटाळले आणि त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी त्याने श्यामची मदत मागितली. श्याम ती छडी हातामध्ये घेतली आणि वरदान मागितले. पहिल्या जसे होते तसे आम्हाला जीवन जगायचे आहे. तू दिलेली सर्व वरदानी परत माघारी घे. आमच्या आयुष्य सुखरूप बनवा.  वरदान मागितल्याप्रमाणे त्यांचे महल सोने-चांदी निघून गेले. आणि मुले पूर्वीसारखी आनंदाने खेळू लागली.

तात्पर्य: आयुष्यात पैसा आणि श्रीमंती ही महत्त्वाची नसते. आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी श्रीमंती किंवा पैसा गरजेचा नसतो.

लांडगा आणि सारस पक्ष्याची कहाणी:

आपल्याला तर माहित आहे कि, लांडगा हा किती चतुर प्राणी आहे. एके दिवशी लांडग्याने सारस पक्षाला जेवणासाठी आमंत्रित केले. रात्रीची वेळ होती. सारस पक्षी लगोलग जेवणासाठी हजर राहिला.

लांडगा आणि सारस पक्षी जेवणासाठी निघाले. लांडग्याने चतुराईने एका पसरट भांड्यामध्ये सारस पक्षासाठी सूप वाढले. सारस पक्ष्याची चोच ही खूप मोठी असल्याने तो सूप पिऊ शकला नाही. सारस पक्षाला खूप राग आला. परंतु तो काही करू शकत नव्हता.

सारस पक्षी त्या रात्री उपाशी राहिला त्याला खूप राग आला होता आणि त्याची इच्छा होती की आपण लांडग्याला चांगला धडा शिकवला पाहिजे.

दुसऱ्या दिवशी सारस पक्षाने लांडग्याला जेवणासाठी आमंत्रित केले. यावेळी पण सुपच बनवले होते. परंतु सारस पक्षाने या वेळी भांडे बदलले होते. पसरट भांडयाच्या ऐवजी खोलगट भांडे घेतले होते. त्यामुळे लांडग्याचे तोंड त्या भांड्यात जात नव्हते. अशा भांड्यामध्ये त्याने सुप वाढले आणि तो आवडीने लांबड्या चोचीच्या मदतीने खाऊ लागला.

लांडग्याला मात्र त्या रात्री काहीच खाता आली नाही. कारण त्या भांड्यामध्ये त्याला आपले तोंड बुडवून खाता येणे अशक्य नव्हते. तो रात्रभर उपाशी राहिला. त्याला आपली चूक समजली आणि आपण केलेल्या दुष्कर्मांची त्याला आठवण झाली.

तात्पर्य: स्वार्थी लोक हा आपला स्वभाव बदलत नाही. त्यांना धडा शिकवून त्यांना त्याच्या स्वभावाची जाणीव करून देणे, हे खूप गरजेचे असते.

लोभी राजा ची कहाणी:

एका नगरांमध्ये एक लालची राजा राहत होता. त्याला संपत्तीछा लोभ असे. लोभापोटी त्यांनी आपल्या नगरातील गरिबांना त्रास देणे सुरू केले. त्यांच्याकडून तो संपत्ती घेऊ लागला.

एके दिवशी त्यांने जंगलामध्ये एका ऋषीमुनींला मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. या बदल्यात आग्रह धरला की मला एक वरदान देण्यात यावे. ऋषी-मुनींनी देखील वरदान मागण्यासाठी इच्छा प्रकट करण्यासाठी सांगितली.

यावरती या राजाने मला असे वरदान देण्यात यावे की, मी ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तूचे सोने होईल, असे वरदान मला द्या असे ऋषीमुनींना सांगितले. ऋषीमुनीने देखील त्याला ही वरदान मिळेल असा आशीर्वाद दिला.

राजा आनंदात आपल्या महालामध्ये आला आणि त्याने महालातील भिंतींना, दरवाजांना आणि इतर वस्तूंना हात लावायला सुरुवात केली. त्या वस्तूं सोन्याच्या झाल्या. महाराजांना पाहून त्यांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली आणि तिने गडबडीने राजांना मिठी मारली परंतु मिळालेल्या आशीर्वादामुळे ती ही सोन्याची पुतली बनून राहिली.

यापुढे महाराजांना जेवण्यासाठी पंचपक्वान्न देण्यात आले. परंतु तेही त्यांना खाता येणे शक्य नव्हते. त्यांनी पंचपक्वान्नांचा हात लावताच ते सोन्याचे बनत होते. राजांना संपत्ती तर मिळत होती पण त्यांचे सुख आणि त्यांची भूक दोन्ही गेली हे राजांना समझले.

त्यांना समजले की आयुष्यात संपत्ती महत्त्वाची नसते, तर सुख आणि अन्न महत्त्वाचे असते. महाराजांनी त्या ऋषीमुनींना खुप शोधण्याचा प्रयत्न केला. परत जंगलामध्ये गेले परंतु ऋषीमुनी त्यांना सापडले नाही आणि राजांचा अंत झाला.

कबुतरांची संख्या:

एकदा राजा अकबराने आपल्या राज्यामध्ये अशी घोषणा करत असा प्रश्न विचारला की, जो प्रश्न एकूण राज्यातील सर्व जनता हैराण झाली. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ती राज्यभर फिरू लागली.

बिरबलाला देखील राज्यातील जनतेच्या कडून हा प्रश्न समजला. प्रश्न असा होता की, आपल्या राज्यात कबुतरांची संख्या किती आहे? राजा अकबराने राज्यातील जनतेला राज्यांमधील कबुतरांची संख्या मोजण्यासाठी सांगितले होते.

बिरबलला प्रश्न पाहून हसू अनावर झाले आणि तो मोठ मोठ्याने हसू लागला. त्याने उत्तराची घोषणा केली. राज्यामध्ये एक लाख वीस हजार पाचशे पंधरा कबूतर आहेत.

जर जास्त भरली तर समजा त्यांचे पाहुणे बाहेर गावातून आले आहेत. जर कमी भरली तर समजा की आपले काही कबूतर पाहुणे बनून इतर राज्यात गेले आहेत. बिरबलाचे उत्तर पाहून राजा खुश झाला आणि त्याने बिरबलाला बक्षीस दिले.

तात्पर्य: प्रत्येक गोष्टीचे समाधान असते आपल्याला फक्त ती शोधण्याची गरज असते.

गर्विष्ठ गुलाब:

एका वाळवंटामध्ये गुलाबाचे झाड अतिशय गर्विष्ठ पणे इतरांचा तिरस्कार करून आरामात वाढत होते. त्याला त्याच्या गर्विष्ठपणा आणि सुंदरपणाचा खूप अहंकार होता.

तो आपल्या शेजारील इतर झाडांची नेहमी थट्टा करत असे. नशिबाने त्याच्या शेजारी एक निवडूंगाचे झाड होते. जे त्याला अजिबात आवडत नव्हते. तो नेहमी त्या निवडुंगाच्या झाडाला टोचून बोलत असत.  नेहमी टोमणे मारत असत.

बाकीच्या झाडांनी गुलाबाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याने त्याचे टोमणे मारणे सोडून दिले नाही. वेळ प्रत्येकाची येते हे म्हणतात, परंतु गुलाबाच्या बाबतीत ते आता घडणार होते.

वाळवंटात पाण्याचा अभाव असल्याने भर उन्हाळ्यात झाडे सुकू लागली. गुलाबाचे झाड हे मुलायम असल्याने ते सर्वात अगोदर सुकले आणि ते विकृत दिसू लागले.

त्याचवेळी निवडुंगामध्ये पाणी साठवण्याची क्षमता असल्यामुळे निवडुंगा अजून हिरवेगार दिसत होते. शेजारी राहणारे प्राणी पक्षी पाणी पिण्यासाठी वणवण फिरत होते त्यावेळी ते निवडुंगा मधील असणारा रस आपल्या चोचीने पीत होते.

गुलाबालाही पाण्याची तहान लागली होती. त्याने निवडुंगाकडे विनवणी केली तू थोडे पाणी मला दिलेस तर खूप मदत होईल. निवडुंग देखील समजूतदार होते, त्याने लगेच थोडेसे पाणी गुलाबाला दिले. गुलाबाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने निवडुंगाची माफी मागितली.

तात्पर्य: जीवनात कधीही कोणाला कमी समजू नका वेळ आणि काळ प्रत्येकाचा येता असतो.

रस्त्यातील आवडला अडथळा:

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने आपल्या राज्यातील प्रजेची परीक्षा घेण्यासाठी रस्त्याच्या मधोमध कोणालाही न सांगता एक भलामोठा दगड रस्त्याच्या मधोमध ठेवला. जो सहजासहजी कोणालाही बाजूला काढता येणार नाही.

असा दगड ठेऊन तो एका बाजूला झाडीमध्ये जाऊन पाहू लागला. कोण हा दगड स्वतःहून बाहेर काढतोय. रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रत्येकाला जाण्यासाठी त्या दगडाच्या बाजूने किंवा दगडाच्या वरून जावे लागते.

परंतु कोणीही व्यक्ती त्या दगडाला हटवण्याचा प्रयत्न करत नव्हता. एवढेच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळातील व्यापारी लोक, मंत्री लोक, दगडाला रस्त्यातून बाहेर काढण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नव्हते.

राजाला आपल्या जनतेतील कामचुकार लोकांची माहिती मिळत होती. तो आज ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होता. काहीजण तर रस्त्यात पडलेल्या दगडाला ठेवण्यासाठी राजाला जिम्मेदार पकडत होते.

तेवढ्यात तिथे एक शेतकरी मजूर आला. त्याने रस्त्यात पडलेला अडथळा पाहिला. त्याने लगेच आपल्या मोलमजूरीची वस्तू बाजूला ठेवून स्वतःच्या कष्टाने तो दगड येथून बाहेर काढला. दगडाला रस्त्याच्या बाजूला नेऊन टाकले यामध्ये त्याची खूप मेहनत आणि वेळ वाया गेला.

पुढे गेल्यानंतर त्याला एक पाकीट दिसले, ज्याच्यामध्ये सुवर्णमुद्रा आणि एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते कि, ह्या सुवर्ण मुद्रा त्या व्यक्तीसाठी जो हा दगड रस्त्यातून बाहेर काढून बाजूला ठेवेल.

तात्पर्य: आपण जीवनामध्ये स्वकार्य करावे त्याच बरोबर समाज कार्य देखील करावे. आपल्याला फळ नक्की मिळते.

आजोबांची गोष्ट:

एका नगरा मध्ये एक आजोबा राहत होते ते आपल्या जीवनाची कधीच खुश नसायचे. इतरांचा तिरस्कार करत असत. ते नेहमीच उदास बसलेले असायचे. ज्याच्या बरोबर बोलतील त्यालाही उदास करायचे. त्याचा अपमान करायचे, त्याचे उनेधूने काढायचे.

ते जेवढे जास्त जगले तेवढे जास्त ते उदास राहिले. जो कोणी त्यांच्याशी बोलत असेल त्याचा दिवस तुम्ही वाईट करून टाकायचे. त्याला ते प्रेरणा देणे ऐवजी उदास म्हणून टाकायचे.

आपल्या उदासीन तेचे कारण ते कोणालाही सांगत नसत. एके दिवशी त्यांच्यामध्ये बदल झाला ते ज्या दिवशी ऐंशी वर्षे ते झाले, तेव्हा त्यांच्यात प्रचंड बदल झाला, ते हसू लागले खुश राहू लागले, आनंदी राहू लागले.

लोकांनाही समजेना हा बदल त्यांच्यात कशामुळे झाला. लोक त्यांना भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांना विचारले कि, तुमच्यामध्ये असा हा प्रचंड बदल कशामुळे झाले आहे.

यावरती या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिले मी 80 वर्षे झाले आनंद शोधत होतो. परंतु मला तो सापडला नाही. मी आनंद शोधत असल्यामुळे मी फक्त जगत होतो, त्याच्यामुळे मला आनंद मिळत नव्हता. परंतु मी ठरवल्याप्रमाणे मला ऐंशी वर्षाचा आनंद मिळाल्याने मी आता आनंद व खुशी शोधणार नाही त्यामुळे मी आज आनंदी आहे.

तात्पर्य: जीवनात सुख शोधण्याच्या मागे जाऊ नका. आपले काम आनंदाने करा. आपोआप जीवनात सुख तुमच्या बरोबर येईल.

मूर्ख गाढवाची कहाणी

एका गावामध्ये एक व्यापारी आपल्या गाढवाला घेऊन दररोज व्यापारमध्ये जात होता. जाताना तो गाढवाच्या पाठीवर मिठाच्या थैल्या बांधून व्यापारात मिठ विकण्यासाठी घेऊन जात असे. असे केल्यामुळे त्याला नवा नफा मिळत होता.

गाढवासोबत मिठाच्या थैल्या घेऊन जात असताना बाजारापर्यंत जाण्यासाठी त्याला एक नदी पार करणे गरजेचे होते. दररोज तो आपल्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या थैल्या बांधून तो नदी पार करत असे. एके दिवशी नदी पार करत असताना गाढवाच्या पाठीवर वरील मीठ नदीमध्ये पडले आणि मीठ पाण्यामध्ये विरघळून गेले.

गाढव पाण्यात उभे राहीले. त्याच्या पाठीवरील ओझे अचानक कमी झाले. अचानक कमी झाले व जी पाहून गाढव खूप झाले. ते नदी आली की मुद्दामून पाण्यात बसू लागले. हि गोष्ट मालकाच्या लक्षात आली. मालकाने गाढवाला अक्कल शिकवण्यासाठी एक युक्ती तयार केली.

एके दिवशी मालकाने गाढवाच्या पाठीवर मिठाच्या थैल्या न देता कापसाच्या थैल्या भरल्या गाढव नेहमीप्रमाणे नदी पशी गेल्यानंतर पाण्यामध्ये बसले. कापूस पाण्यामध्ये भिजल्यामुळे अधिकच जड झाला गाढवाचे ओझे खूप वाढले.

गाढवाला वजन सहन करणे एवढे जड झाले कि ते पुन्हा पुन्हा पाण्यात पडू लागले. त्याला शिक्षा आणि अक्कल दोन्ही मिळाली.

तात्पर्य: आपण आपले काम नेहमी प्रामाणिकपणे केले पाहिजे. स्वार्थासाठी आपल्या कामांमध्ये खोट निर्माण होईल असे कोणतेही प्रयत्न करू नये.

दोन बेडकांची कहाणी:

एका जंगलामध्ये बेडकांचा समूह तलावाच्या शोधामध्ये फिरत होता. जिथे त्यांना जाऊन तलावांमध्ये राहण्यास मिळेल असे स्थान ते शोधत असताना ते जंगलांमधून फिरत होते.

जंगलामध्ये फिरत असताना त्यातील दोन बेडके एका प्रचंड मोठ्या खड्ड्यामध्ये पडली. त्यांना खड्ड्यांमध्ये पडलेले पाहून त्यांचे इतर बंधू मित्र यांनी त्यांना उडी मारून खड्ड्यातून बाहेर येण्यास सांगितले.

ते दोघे प्रयत्न करत होते परंतु ते खड्ड्यांमधून बाहेर येण्यास असमर्थ ठरत होते. शेवटी त्यातील एक बेडकाने खड्डयामधून बाहेर येण्याची प्रयत्न सोडून दिले. त्याचा तिथेच मृत्यू झाला.

दुसरा बेडूक मात्र निरंतर प्रयत्न करत राहिला. त्याची एक मोठी उडी त्याला खड्ड्यातून बाहेर घेऊन आली. त्याला पाहून त्याचे इतर मित्र त्यावेळी त्याला म्हणाले, हि तर अशक्य गोष्ट होती की, तू एवढ्या भल्या मोठ्या खड्ड्यातून बाहेर येणे. तू हे कसे काय केलेस.

यावरती बेडूक म्हणाला मी तर न घाबरता फक्त माझे प्रयत्न करत होते. त्याचे फळ मला मिळणार किंवा न मिळणार याचा मी विचार केला नाही. मी फक्त निरंतर प्रयत्न करत राहिलो.

तात्पर्य: आपण आपले निरंतर प्रयत्न करत राहिले पाहिजे. एकेदिवशी आपल्याला त्याचा मोबदला नक्की मिळतो.

हत्तीची कहाणी

एका जंगलामध्ये एक नवीन हत्ती राहण्यासाठी आला. हत्तीची इच्छा होती कि जंगलामध्ये आल्यानंतर त्याचा कोणीतरी दोस्त बनेल. या विचाराने तो प्रत्येकाला विचारू लागला की, तुम्ही माझे दोस्त बनाल का?

पहिला तो बेडकापशी गेला. त्याने बेडकाला प्रश्न विचारला की, तू माझा दोस्त बनशील का? त्यावर ती बेडूक हा त्याला म्हणाला तुला माझ्यासारखी उंच उडी मारता येत नाही, त्यामुळे तू माझा दोस्त बनू शकत नाही.

पुढे तो माकडापाशी गेला त्याने त्यालाहि विचारले की, तुला माझा दोस्त होण्यास आवडेल का? माकड त्यावर म्हणाले तुला झाडावर चढता येते का? तू माझा दोस्त होऊ शकत नाही. असे करत त्याने सगळ्या प्राण्यांना विचारले. परंतु त्याचा कोणी जोशी होण्यास तयार नव्हते

एकेदिवशी जंगलामध्ये पळापळ चालू झाली. सगळे प्राणी पक्षी सैरावैरा पळू लागले. त्या हत्तीने माकडाला विचारले की, सगळे सैरावैरा का पळत आहेत. त्यावर ते माकड म्हणाले, जंगलामध्ये सिंह आलाय.

तो शिकारीसाठी बाहेर निघालाय. आपली शिकार होऊ नये म्हणून प्रत्येकजण आपला जीव वाचवत आहे. असे ऐकल्यानंतर हत्ती त्या सिंहाकडे गेला. हत्ती त्याला म्हणाला, तू या गरीब प्राण्यांची शिकार करू नको.

सिंहाने त्याचे अजिबात ऐकले नाही. त्यानंतर हत्तीने सिन्हाला पळवून लावले. हे बघितल्यानंतर सर्वांनी आपले प्राण वाचवल्यामुळे हत्तीला आपले दोस्त मानले.

तात्पर्य: सर्वांची काहीना काही कमतरता असते. तसेच प्रत्येकाकडे चांगले गुण देखील असतात. आपण सर्वांशी एकत्र मिळून मिसळून वागले पाहिजे.

सोनेरी कुऱ्हाडीची गोष्ट –

एका जंगलामध्ये एक लाकुडतोड्या राहत होता. तो जंगलामध्ये जाऊन दररोज लाकडे तोडत असत. त्यांना एकत्र करून तो बाजारांमध्ये विकत असत. त्याचे हे दररोजचे काम खूप चांगले चालले होते. लाकडे तोडण्यासाठी कुर्हाडीचा वापर करत असत.

एके दिवशी विहिरी शेजारी लाकूड तोडताना त्याची कुऱ्हाड विहिरीमध्ये पडते. तो कुऱ्हाडीला विहिरीतून काढण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु तो काढण्यास असमर्थ ठरतो. तो निराश होऊन घरी जातो. आपली कुऱ्हाड भेटेल याची त्याला चिंता वाटू लागते. दुसऱ्या दिवशी तो विहिरीच्या किनारी बसून रडू लागतो.

त्याच्या रडण्याचा आवाज पाहून विहिरीतून सोनपरी बाहेर येते. ती त्याला प्रश्न विचारते की तु का रडत आहेस? त्याने घडलेली घटना त्या सोनपरीला सांगितली. ती त्याला मदत करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा अदृश्य झाली.

अदृश्य झालेली सोनपरी पुन्हा लाकूडतोड्याच्या समोर आली. तिच्या हातामध्ये सोन्याची कुऱ्हाड होती. लाकूडतोड्याला पाहून ती म्हणाली ही तुझी कुऱ्हाड आहे का? यावरती लाकूड तोड्या म्हणाला, माझी कुऱ्हाड नाही.

ती पुन्हा अदृश्य झाली आता तिच्या हातामध्ये चांदीची कुराड होती. तिने परत लाकूडतोड्याला प्रश्न विचारला. ही तुझी कुऱ्हाड आहे का? यावर ती पुन्हा लाकूड तोड्या म्हणाला. ही माझी कुऱ्हाड नाही.

सोनपरी पुन्हा अदृश्य झाली. यावेळी तिने लाकूडतोड्याची कुऱ्हाड हातामधे घेतली होती. कुऱ्हाड बघून लाकुडतोड्या खुश झाला. तो म्हणाला ही माझी कुऱ्हाड आहे. त्याची इमानदारी पाहून तिने त्याला तिन्ही कुऱ्हाडी भेट दिल्या.

तात्पर्य: आपण इमानदारीने जगल्यास आपले नेहमी चांगलेच होते.

जादूचे झाड

एका गावामध्ये दोन मित्र राहत होते. ते जिवलग मित्र होते, त्यांचे नाव होते राम आणि शाम. त्यातील राम शामचा तिरस्कार करून नेहमी करून त्याच्या सर्व वस्तू स्वतः वापरत असत. शाम मात्र दयाळू होता. तो रामची नेहमी मदत करत असत.

एके दिवशी रामच्या मनात आले की, आपण शेजारच्या जंगलामध्ये जाऊन लाकडे तोडून आणि त्यातून जे पैसे मिळतील त्यातून मजा करूया. हा विचार करून राम जंगलात गेला. जंगलात जाताना त्याला एक जादूचे झाड दिसले.

तो त्या झाडापाशी गेला आणि ते कापू लागला. तेवढ्यात ते जादूची झाड म्हणाले, मला कापू नको मला जर तू सोडून दिले, तर मी तुला एक जादूचे सफरचंद देईन. याचा फायदा करून तू तुझी सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. रामला आनंद झाला त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये लोभीपणा पण निर्माण झाला.

त्याने विचार केला या झाडाला कापले तर झाड पडल्यानंतर मिळणारे सर्व सफरचंद मी घरी घेऊन जाऊ शकतो. मी त्यांचा फायदा करू शकतो. असा विचार करून त्याने झाड कापण्यासाठी झाडापाशी निघाला. तेवढ्यात त्याच्या अंगावर झाडाची एक फांदी पडली फांदी पडल्यामुळे तो जखमी झाला.

जखमी अवस्थेत असताना तो त्या फांदी खाली अडकून पडलेला होता. त्याच्या छोट्या भावाला आपला मोठा भाऊ का घरी येईना याची चिंता लागून राहिली. तो त्याला शोधण्यासाठी जंगलात निघाला. जंगलात त्याने त्याला फांदी खाली अडकलेले पाहिले.

या अवस्थेत पाहून त्याला त्याची दया आली. त्याने लगेचच त्याची सुटका केली. त्याला जी जखम झाली होते त्याच्यावर त्याने त्याला औषध लावले. आपल्या छोट्या भावाचे आपल्यावरचे प्रेम पाहून रामला मनातूनच स्वतःवर आणि त्यांनी केलेल्या कृत्यांवर लाज वाटू लागली. त्याने श्यामची माफी मागितली.

तात्पर्य: नेहमी वाईट माणसासोबत वाईट कृत्य करून चालत नाही. त्याला आणि त्याचे मन जिंकायचे असते तर आपण आपली शीतलता आणि दयाळू स्वभाव अजिबात सोडू नये. तो एके दिवशी नक्की बदलेल.

लोबी सिंह –

एका जंगलात एक सिंह रहात होता. एक दिवशी त्याला खूप भूक लागली. आपली भुखेची तहान भागवण्यासाठी तो जंगलात फिरू लागला त्याला समोर एक ससा दिसला. पण त्याने मनामध्ये विचार केला की हा ससा तर खूप लहान आहे.

याला खाऊन तर आपली भूक भागणार नाही. असा विचार करून त्यांनी त्याला सोडून दिले. पुढे तो गेला खूप दूर जाऊनहि त्याला काहीच सापडत नव्हते. तो अतिशय थकला होता. यात त्याला पुढे एक हरिण दिसले.

तो हरणाला पकडण्यासाठी गेला, परंतु तो दमलेला असल्याने त्याला ते हरिण पकडता आले नाही. तो दमलेल्या अवस्थेत एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसला. विश्राम करत असताना त्याच्या मनामध्ये ससा आठवला. त्याला जाणवले की मी जर त्याला खाल्ले असते. तर माझी थोडीतरी भूक भागली असती. तो परत माघारी गेला पण तेथे ससा नव्हता. ससा तेथून निघून गेला होता. सिंह त्या दिवशी उपाशी राहिला.

तात्पर्य: अति लोभीपणा हा नेहमी घातक ठरतो. त्यामुळे जास्त लोभ करणे टाळावे.

Short Story in Marathi with Moral मध्ये अजून नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.