College Marathi Love Story

Romantic love story in Marathi: marathi Love story मध्ये पहिले प्रेम गोष्ट आहे एका तरुण प्रेमीयुगुलाची जे नुकतेच कॉलेजला ऍडमिशन घेऊन आपले आयुष्य जगण्याची सुरुवात करत होते. कहाणीचा शेवट जसा दिमाखदार आहे, तेवढाच मनाला ठेच आणि हळहळ व्यक्त करणारा देखील आहे. त्यामुळे कहानी शेवटपर्यंत नक्की कहाणी वाचा.

एक खरी गोष्ट आहे, ज्यामध्ये घडलेले पात्रं दुसरे कोणी नसून तो मी स्वतः आहे. ही गोष्ट त्या वेळची आहे, जेव्हा मी माझ्या कॉलेज लाईफला सुरुवात करून फर्स्ट इयर फार्मसी ला ऍडमिशन घेतले होते.

कॉलेज मधील मराठी लव स्टोरी (Marathi Love story)

Marathi Love story

माझा कॉलेजचा पहिला दिवस होता. मी इतर दिवसांपेक्षा जरा जास्तच खूष होतो. कारण की मला खूप कष्टानंतर फार्मसीला ऍडमिशन मिळाले होते. कॉलेज लाईफमधला माझा हा अनुभव एकदम नवा होता. (College Love Story in Marathi)

मी ठरवलं होतं की मी माझं कॉलेज लाइफ अत्यंत आनंदात काढणार. त्याच्यामध्ये मी सर्व गोष्टींचा आनंद घेणार जेणेकरून पुढील आयुष्यात मी माझ्याकडे अशा आठवणी साठवून ठेवणार की त्या आठवून माझे चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झाले पाहिजे. या विचाराने मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आलो.

जुलै महिना होता. थोडासा पाऊस ओसरत होता. पावसाच्या थोड्या रिमझिम धारा पडत होत्या. कॉलेज डोंगराच्या नजदीक असल्यामुळे डोंगरावरती पावसाळ्यातली हिरवळ तयार झाली होती.

डोंगर पुर्ण हिरवागार दिसत होता. चारो दिशेला हिरवळ पसरली होती. यामध्येच वाऱ्याची थंडगार झुळूक आपल्या चेहऱ्याला आणि अंगाला स्पर्श करून पुढे सरसावत होती.  या वातावरणाला पाहून असे वाटत होते की, निसर्ग दृष्टी देखील माझ्या स्वागतासाठी आज बहरली आहे.

माझ्यासाठी कॉलेजचा पहिला दिवस हा एक स्वप्न असल्यासारखा होता. ज्यामध्ये मी पाहिलेले स्वप्न आज साकरन्यात येत होतं. कॉलेजमधलं हे वातावरण पाहून मला पहिल्याच दिवशी कॉलेजवर खूप प्रेम निर्माण झाले होते. हा माझा एक आठवणीतला अविस्मरणीय क्षण होता.

True Love Stories In Real Life in Marathi

True Love Stories In Real Life in Marathi

पहिल्या दोन-तीन दिवशी मी वर्गामध्ये बसलो. वर्गामध्ये मी काही मित्रांशी दोस्ती केली. त्याच बरोबर कॉलेजमधील कॅन्टीन वर मध्ये बसून मजा देखील गेली. कॅन्टीन मध्ये बसलेलो असताना समोरील खिडकीतून एक सुंदर मुलगी जाताना दिसली. ती थोडी दूर असल्यामुळे मला तिचा चेहरा बघता आला नाही.

लांबूनच पाहिल्यानंतर एवढी सुंदर दिसत होती. तिचे सुंदर केस आणि तिने परिधान केलेला तो सुंदर पोशाख पाहून माझी नजर तिच्यापासून दूर हटत नव्हती. मी तिचा पाठलाग करत होतो. परंतु मला ती दिसण्याच्या अगोदरच ती तिच्या वर्गात निघून गेली.

पुढील काही दिवस असेच गेले. एके दिवशी आमचा क्लास नसल्यामुळे आम्ही मित्र गप्पा मारत बसलेले असताना रिमझिम पाऊस पडत होता. अशा वेळी मला पुन्हा एकदा ती मुलगी दिसली. तिचा तो ड्रेस माझ्या नजरेत भरला होता.

मी पुन्हा तिचा पाठलाग केला परंतु या क्षणाला देखील ती मला भेटली नाही. मी रात्री झोपलो तरी मला तुला सुंदर ड्रेस आणि सुंदर केस असलेली सुंदर मुलगी दिसत होती.

100+ Short Story in Marathi with Moral for Children’s

मला कसल्याही परिस्थितीत तिला जवळून पाहायचं होतं. माझे मन आतुर झाले होते. एके दिवशी मला कॉलेजला येण्यासाठी उशीर झाला तसं आमचं कॉलेज नऊ वाजता भरायचं, परंतु त्या दिवशी मला दहा वाजले. मी पार्किंग मध्ये गाडी पार्क करत होतो.

अशाच वेळी समोरून तो ड्रेस आणि तो सुंदर चेहरा माझ्या समोर आला. तीही तिची स्कुटी पार्किंगमध्ये पार्क करत होती. कधी नव्हे मला येण्यासाठी उशीर झाला होता. पण या क्षणाला तो माझ्या सर्वात आयुष्यातला अविस्मरणीय क्षण ठरला. कारण की मला तिचं जवळून दर्शन झालं.

Cute Love Stories in Marathi

Cute Love Stories in Marathi

माझी पहिली मुलाखत तिच्याशी पार्किंगमध्ये झाली. गाडी पार्क करत असताना जेवढी माझी गाडी गरम झाली नव्हती, त्याच्या दहा पटीने माझा अंग तापत होतं.

तिच्या चेहऱ्यामध्ये एवढी जादू होती की मला फक्त तिच्याकडे आकर्षण झाले. या क्षणाला मी पूर्णपणे सुन्न झालो होतं. मला काहीच आठवत नव्हते मला फक्त तिलाच बघत राहावे असेच वाटत होते.

मला तीला पाहुन वाटत होते की या जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला मी आज बघत आहे. तिला बघताच माझ्या मागे अचानक संगीत वाजू लागला आहे, असा मला भास होऊ लागला.

त्याचबरोबर मला असाही भास होत होता की, मी या क्षणाला हवेमध्ये उडत आहे. माझ्या आयुष्यातील सर्व सुख आज माझ्या समोर आले आहेत असे मला वाटते होते. खरोखरच ही जाणीव या शरीराला अविस्मरणीय होती.

पहिले तर मला कॉलेजला जायला खूप आवडत होते परंतु आता तर मला कॉलेजला जाताना जो आनंद मिळत होता तो गगनात ही मावत नव्हता.

मला असे वाटत होते ती मला प्रेम झाले आहे. मला आता तिचं नाव जाणून घेण्यात खूप आतुरता होती. तिचं नाव आणि तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी मी दररोज तिच्या कॉलेजच्या वर्गाच्या बाहेर उभारायचं जेणेकरून तिला कोणीतरी हाक मारेल आणि मी तिचं नाव ओळखू शकेल.

यातच काही दिवस गेले. एके दिवशी तिला तिच्या मैत्रिणींनी तिच्या नावाने हाक मारली. नाव ऐकून मला खूप आनंद झाला कारण की हे नाव आता माझं होणार होतं. असा मला विश्वास होता. नाव होतं तिचं माधुरी

True Love Story in Marathi

True Love Story in Marathi

आता माझ्या दिवसाची सुरुवात होत होती माधुरी नाव घेणे आणि शेवट देखील होता माधुरीची आठवण काढून झोपी जाण्याने. आता मात्र मी निलेश माधुरीची स्वप्न पाहत होतो. तिचं आणि माझं नाव मी आमच्या वर्गाच्या बेंच डेस्कवर लिहायला लागलो होतो.

का माहित पण तिचं नाव माझ्या नावावर सोबत जोडलं की मला एक वेगळाच आनंद मिळत होता. हळूहळू माझे मित्र देखील मला तिच्या नावाने चिडवायला सुरुवात केली होती.

माझं प्रेम हे अजून नवीन होतं. ते तिला पाहूनच मी मला समाधानी आणि आनंदी मानत होतो. मला तिच्या बरोबर बोलायचं होतं पण सुरुवात कशी करावी या विचारात मी होतो. जेव्हा ती माझ्या शेजारून जायची माझ्या मनामधे एक वेगळीच हालचाल निर्माण व्हायची. असं वाटायचं आपलं हृदय आत्ता बंद पडेल.

20+ Akbar Birbal Story in Marathi with Moral

ती तिच्या मैत्रिणी सोबत बोलत बसायची. मीहि माझ्या मित्रांसोबत बोलत असायचो. माझं सारखं बघने हे तिला थोडसं जाणवायला लागले होते. तिला असं वाटू लागले होते कि, हा आपल्याकडे बघतोय काही दिवस असेच गेल्यानंतर एकदा तिची न् माझी नजरेला नजर मिळाली. मी थोडा लाजलो आणि मी नजर खाली केली.

असंच पुढे काही दिवस चालू राहील. तिला थोडा संशय आला होता, किंबहुना ती थोडीशी मला पाहून लाजू लागली होती. मला खात्री आहे त्या वेळी तिला माझ्या मनातील भावना नक्कीच तिला समजत असतील.

Romantic Love Story in Marathi

Romantic Love Story in Marathi

ती माझ्यापासून थोडी दूर राहायला लागली. मैत्रिणी सोबत बोलत असताना अचानक समजा मी तिथे आलो तर ती अबोल व्हायला लागली. मला माहित नाही हे नक्की काय होते, पण ती माझ्याजवळ नक्कीच येत होती. सखाराम गोष्टी घडत होत्या. माझे एक तर्फे प्रेम तर नक्कीच होतं मला तिच्या मनातील भावनांची उत्सुकता देखील होती.

जशी पहिल्या प्रेमाची निशाणी असते, नजरेला नजर आमची मिळत होती, आम्हा दोघांनाही समजलं होतं की आम्ही दोघंच दोघेही एकमेकांना छुप्या नजरेने पाहत होतो.

एकदा मी आणि माझे दोस्त कॉलेजच्या आवारामध्ये बसलो असताना मला छुप्या नजरेने कोणीतरी पाहात होतं. माझे मित्र म्हणाले निलेश तुला कोणीतरी छुप्या नजरेने पाहत आहे. मी थोडा अचंबित झालो, त्याचबरोबर स्तब्धदेखील झालो. ही दुसरी तिसरी कोणी नसून माधुरी होती.

मला जाणवले की तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच आकर्षण होतं. असं वाटत होतं की तिला मला काहितरी सांगायचे आहे. या नजरेने ती माझ्याकडे बघत होती. आजपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना छुप्या नजरेने पाहत होतो मात्र आज समोरासमोर आमची नजर भिडली होती.

मी आतून खूप खूप झाले होतो. आजपर्यंत माझी देखील हिंमत झाली नव्हती की, अशा नजरेने मी तिला पाहिले परंतु तिने माझे काम खूप सोपे केले. ती एकटक माझ्याकडे बघत राहिली असं वाटत होतं की ती आज सगळे मला सांगणार आहे.

New Love Story In Marathi

New Love Story In Marathi

थोड्यावेळाने ती तिथून निघून गेली. तिने घातलेला तो लाल कलरचा पंजाबी ड्रेस तिची तिचे सौंदर्य अजून उजळून टाकत होते. त्या रात्री मी मनामध्ये विचार केला आता मात्र बस झाले. जे काही करायचे ते पटकन केले पाहिजे. एक चांगली वेळ पाहून माधुरीला माझ्या मनातील भावना सांगणार आहे. हे मी माझ्या मनाशी घट्ट केले होते. तश्या वेळेची मी वाट पाहत होतो.

मी नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कॉलेजला येण्यासाठी निघालो. मला माहित होतं तिला कॉलेजला यायला थोडासा वेळ जातो. मी तिच्या अगोदर अर्धा तास येऊन पार्किंगमध्ये तिची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानंतर मी पार्किंगमध्ये आलो मी थोडासा घाबरलेला होतो.

परंतु मी आज विचारच करून आलो होतो माधुरी बद्दल जे काही वाटते ते मला तुला सांगायच आहे. असा विचार करून मी स्वतःला सावरलं आणि मी तिला Hello म्हणालो. ती पण मला hi म्हणाली. तिने विचारले कसा आहेस? मी म्हणालो ठीक आहे. मी परत प्रश्न विचारला की तुझा अभ्यास कसा चालू आहे? ती म्हणाली थोडं कठीण आहे पण प्रयत्न चालू आहेत.

मी म्हणालो आम्हा फार्मसीवाल्यांना कंप्यूटर इंजीनियरिंग एवढं माहीत नसतं. त्यावर ती म्हणाली तुला कसं माहित मी कंप्यूटर इंजीनियरिंगला आहे. या प्रश्नावर ती मी थोडा गडबडलो. मी म्हणालो मी खूप वेळा तुला त्या वर्गामध्ये पाहिला आहे म्हणून अंदाज बाळगला बाकी काही नाही.

ती हसत तिथून निघून गेली. ही आमची होती पहिली भेट. मला या भेटीतून एवढं समजलं की ती माझ्यावर बोलताना बिनधास्त राहते. आता आमची भेट वाढू लागली. आम्ही पुढे आमच्या भेटीचे रूपांतर हळूहळू दोस्तीमध्ये झाले. मला मनातून असे वाटत होते की ती मला आता पसंद करू लागली होती.

याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये एकत्र भेटायचं तिच्या डिपार्टमेंट जरी वेगळा असेल तरी पण ती मला आवर्जून भेट द्यायची. एके दिवशी जर मी घरी राहिलो असलो किंवा कॉलेजला येऊ शकलो नाही तर ती मला फोन करून विचारायची की आज तू का नाही आला.

याच बरोबर जेव्हा माझी तब्येत खराब व्हायची आणि मी कॉलेजला जाऊ शकलो नाही तेव्हा ती माझ्या मित्रांमध्ये माझी चौकशी करायची. त्याच्यावरून मी अंदाज बांधला होता. ती मला आवडते तेवढाच मीही तिला आवडत असेल.

कधीतरी मला असे देखील वाटायचे कि तीला माझी खूप काळजी असेल. आता माझे प्रेम त्या क्षणापर्यंत पोहाचले होते. माझे मन मला सांगत होते हीच ती वेळ आहे. आता तिला माझ्या मनातील तीच्याबद्दलचे प्रेम सांगण्याची वेळ आली होती.

हा विचार करून मी दिवाळी सुट्ट्या लागण्याच्या आधी तिला विचारण्याचे ठरवले. तसेपण आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो. मला तिला दररोज पाहता येत होते. आम्ही कॅन्टीन मध्ये बसून वेळ घालवत होतो. पण ती माझ्याबद्दल नक्की काय विचार करतेय हे मला जाणून घ्यायचे होते.

मी एक दिवस निवडला. ती तारीख मी कधी नाही विसरू शकणार तारीख होती ३ ऑक्टोबर. कारण याच दिवशी तिचा वाढदिवस होता. मी याच दिवशी तिला प्रपोज करणार होतो.

तिच्या वाढदिवसाला तिलाच विचारायचे हे थोडे न पटण्यासारखे होते. पण मी विचार केला होता. मला तो दिवस आणि क्षण ती कधीही विसरू शकणार नाही अस बनवायचा होता. हे असले तरी मी मनातून थोडा भिलेला होतो.

मी सकाळी लवकर उठलो अंघोळ करून कपडे लगेच घालून देवाची कधी न्हवे ती पूजा केली. त्यानंतर आई वडिलांच्या पाया पडून मी कॉलेजला जाण्यासाठी निघालो. रस्त्यातून जाताना मी तिच्या आवडीचे ice cream चोकलेट आणि गुलाब घेतला.

मला सर्वप्रथम तिला प्रपोज करायचे होते. ह्या एकाच हेतूने मी दोन तास अगोदर कॉलेजच्या पार्किंगमध्ये येऊन बसलो होतो. मी दोन तास वाट पाहिल्यानंतर चक्क माधुरी पार्किंगमध्ये आली. मी तीला पाहून Good morning म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली की आज की जरा वेगळाच वाटतोय. कोणती खास गोष्ट आहे का?

तसे काही नाही मी तीला म्हणालो. मी तिला wish केले. तिने ही thank you असे म्हणाली. मी तिला म्हणालो की मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मी तिला म्हणालो तुला इथे नाही सांगू शकत. तु मला classroom madhye भेटशील का?

यावरती ती दोन मिनिट विचार करू लागली. पण अखेर ती मला म्हणाली तू पुढे जा मी आलेच १० मिनिटात. असे म्हणून मी क्लास रूम मध्ये गेलो. सकाळच्या वेळेस तसा क्लास रिकामाच असायचा. काही वेळ वाट पाहिल्यानंतर माधुरी क्लास मध्ये आली.

मी तिला बसण्यासाठी सांगितले. बोलताना मी थोडा चाचपडत होतो. ती दीर्घ श्वास घेतला आणि मी म्हणालो की मला तुला काहीतरी सांगायचे आहे. पण हिंमतच होत नाही. मी माझे डोळे मिटले आणि म्हणालो की मी ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून तू माझी पहिली आणि शेवटची पसंद आहे. मला माहित होतं की मी वाक्य बोलताना थोडा चुकलो होतो.

तरीपण मी माझे बोलणे सुरूच ठेवले होते. मी म्हणालो माझ्या नजरेत फक्त आणि फक्त तुझाच चेहरा आहे. दुसऱ्या कोणासाठी तू एक मुलगी असशील पण माझ्यासाठी तु सोनपरी आहेस, जी दररोज रात्री माझ्या स्वप्नात येतेस. मला अशी खात्री आहे की तूच ती जीच्यासोबत मला पूर्ण आयुष्य घालवायचे आहे.

जेव्हा तू मला पाहून हसतेस मला असे वाटते की, त्यावेळी मी जगातील सर्वात आनंदी मुलगा बनतो. मला माहित नाही मी आता जे तुला बोलल्यावर तू माझ्याबद्दल काय विचार करत असशील.

मला नाही माहित की मी एवढे बोलल्यावर आपली दोस्ती राहील की नाही राहील. माधुरी मी तुला जबरदस्ती नाही करणार की तू माझ्या प्रेमाचे उत्तर आताच दिले पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या जवळ ठेवलेला एक लाल रंगाचा गुलाब काढला आणि गुढघ्यावर बसून मी i love you madhuri असे बोललो. याचबरोबर मी तिला चोकलेट आणि ice cream देखील दिले.

पुढील दोन मिनिटे भयानक शांततेत गेली. तिने चोकलेट ice cream आणि मी दिलेले गुलाबाचे फुल शेजारील बेंचवर ठेवले. हे पाहून मी थोडा घाबरलो. मनातून वाटले संपले आता सगळे. माधुरी तिच्या जागेवरून उठली तिच्या चेहऱ्यावरील भाव मला कळतच नव्हता. ती क्लासरूम मधून बाहेर जाण्यासाठी निघाली. आता मात्र मी मनातून रडत होतो.

ती दरवाज्यापाशी गेली तिने इकडे तिकडे पाहिले आणि परत माघारी आली. ती म्हणाली आता फक्त मीच बोलणार आणि तू ऐकणार.
तिने माझ्या हाताला पकडले आणि मला धरून तिने बेंच वरती बसवले. ती म्हणाली आतापासून आपण दोघे मित्र नाही राहिलो. तुझ्यात आणि माझ्यात असणारी दोस्ती आता प्रेमात बदलली आहे.

मला आता तुझी girlfriend होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. तु तर मला पहिल्या दिवसापासून आवडत होता. तु सुंदर तर दिसतोस पण तुझा स्वभाव आणि वागणूक देखील खूप सुंदर आहे. कोणी मूर्खच असेल जी तुला नाही म्हणेल.

मला त्याचं दिवशी तुझ्यावर प्रेम झाले होते जेव्हा मी आजारी असताना तू माझी काळजी घेतली होती. हे तोच करू शकतो. ज्याला समोरच्याची खूप काळजी असते. असे म्हणून मी ज्या उत्तराची वाट पाहत होतो ते ती मला म्हणाली I Love you Nilesh.

पुढे मी प्नुहा एक मिनट स्तब्ध झालो. मला खरंच कळत नव्हते की हे स्वप्न आहे की खरंच माझ्या सोबत हे घडतंय. ती मला म्हणाली असाच काय बघतोय मला मिठीत घेणार नाहीस का?

मी थोडा सावरलो आणि पाणावलेल्या डोळ्यांनी मी पुढे हात केला. ती माझ्या मिठीत होती आणि मी स्वर्गात. आज जरी आम्ही दोघे एकत्र नसलो तरी देखील ती आणि मी कधीही समोर आलो तरी तो क्षण आमच्या डोळ्यासमोर नक्की येतो. तिला पाहिले तरी मी कॉलेज मध्ये पुन्हा स्वतःला पाहतो आणि स्वप्नात जगतो. marathi Love story मध्ये असच होतं.