20+ Akbar Birbal Story in Marathi with Moral

आजच्या या लेखात, आम्ही मराठीमधून सर्वोत्तम अकबर बिरबल लघुकथा सादर केल्या आहेत. (Akbar Birbal Story in Marathi with Moral). अकबर आणि बिरबल यांच्या जगप्रसिद्ध कथा जाणून घेण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी नक्की वाचा.

Akbar Birbal Story in Marathi with Moral: (अकबर बिरबलच्या कथा)

Akbar Birbal Story in Marathi with Moral

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही अकबर बिरबल (Akbar Birbal Stories With Moral In marathi) च्या कथा सांगितल्या आहेत. या कथा तुम्हाला मनोरंजनासोबत शिक्षणही देतील. अकबर बिरबलाच्या या अद्भुत कथाचा आनंद घ्या.

चोराच्या मनात चांदणे: (Short Stories in Marathi with Moral for Kids)

एके दिवशी राजा अकबर त्याच्या महलामध्ये बसला असताना त्याने चे अंगठी काढून ठेवली. महालातून कोणीतरी ती चोरी केली. अंगठीला खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही आणखी सापडले नाही. थोड्या वेळाने घडले घडलेली सर्व घटना त्याने बिरबलाला सांगितली. बिरबलाने राजांना प्रश्न विचारला शेवटी तुम्ही त्या अंगठीला कोठे पाहिले होते.

त्यावरती राजा म्हणाला, बिरबल मी अंघोळ करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मी तिला काढून ठेवले होते. यावरती बिरबल म्हणाला महाराज ते संदुक कोठे आहे? महाराजांनी उत्तर दिले की ते आहे पण त्यातील अंगठी गायब आहे.

उत्तर ऐकताच बिरबल म्हणाला, महाराज तुमची अगठी हरवली नाही तर ती चोरीला गेली आहे. बिरबलाने लगेच सेवकांना बोलावले. त्या दिवशी महालात ५ सेवक कामाला होते.

त्या सर्वांना राजासमोर उभे करण्यात आले. राजाने सर्वांना प्रश्न विचारला की, तुम्ही खरे सांगा की तुमच्यापैकी अंगठी कोणी चोरलली आहे. यावर्ती सेवकाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने बिरबलाने शक्कल लढवली.

बिरबल म्हणाला, हे पहा तुम्ही जरी सांगितले नाही तरीहि मला समजेल. कारण तुम्ही ज्या संदूक मधून ही अंगठी चोरली होती तो मला नक्की सांगेल की अंगठी कोणी चोरली.

असे म्हणून बिरबल संदुकापाशी गेला. कान जवळ करून संदुकला विचारले त्यावरती संदुकाने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. नंतर तो सेवकांपाशी आला आणि म्हणाला की मला संदुकाणे सांगितले आहे की, जो कोणी चोर आहे त्याच्या दाढी मध्ये तीनका आहे. असे म्हणताच त्यातील एक सेवक त्याच्या दाढी वरून हात फिरवू लागला. हे बघताच चोर सापडला. बिरबल अकबराला म्हणाला.

शिक्षा: दोषी व्यक्ती गडबडीमध्ये चुकीच्या गोष्टी करतो त्यामुळे तो फसतो आणि सापडतो. त्यामुळे कोणत्याची चुकीच्या गोष्टी केल्या तर त्या सांगा लपवून ठेवू नका.

राजा अकबर बिरबल सखाराम आणि कबूतर: (Short Marathi Story with Moral)

राजा अकबरला एका राज्यातील वैद्याने एक कबूतर भेट दिले होते. राजाला ते कबुतर खूप आवडायचे. त्याची देखभाल करण्यासाठी त्यांनी सखाराम नावाच्या एका नोकराचे नेमणूक केली होती. सखाराम दररोज कबुतराची काळजी घेत असे.

राजाने सखारामला सांगितले होते की, जो कोणी व्यक्ती या कबुतराची मरणाची खबर मला पहिल्यांदा सांगेल, त्याला सजा देण्यात येईल कारण ते कबूतर राजा अकबराच्या खूप जिवलग होते. तो त्याच्यावर खूप प्रेम करत असे.

एके दिवशी काही कारणास्तव ते कबुतर मरण पावले आता मात्र सखारामला कळेना की हि खबर महाराजांना दिली तर आपल्याला शिक्षा होईल. त्यांनी विचार केला या राज्यातील गरिबांचा पालनहार हा फक्त बिरबल आहे. तोच आपल्याला यातून बाहेर काढेल असा विश्वास बाळगूनी सखाराम बिरबलपाशि गेला.

त्याने झालेला सर्व प्रकार बिरबलाला सांगितला. बिरबल देखील म्हणाला मी महाराजांना या कबुतराची मरणाची वार्ता सांगतो. जी काही शिक्षा होईल ती मला होऊ द्या. काही वेळानंतर मला बिरबल साहेब महाराज अकबराच्या येथे गेले.

त्यांचा मूड पाहून त्यांना ही वार्ता सांगायची होती. अकबर खुशीत असलेले दिसतात बिरबल म्हणाला महाराज तुम्हाला ते कबूतर आठवते का? राजा म्हणाला हो नक्कीच माझे खूप प्रिय आहे.

बिरबल म्हणाला महाराज, आज मी त्याला एका विचित्र अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेले पाहिले. त्याला पाहून असे वाटत होते तिथेच झोपून कोणता तरी दीर्घ विचार करत आहे.

हे ऐकल्यानंतर महाराज लगेच त्या कबुतरांना पाहण्यासाठी तेथे गेले. त्यांनी कबुतराला पाहिल्यानंतर बिरबलाला म्हणाले. बिरबल तुला कळत नाही काय हे कबूतर मरण पावले आहे.

एवढे बोलल्यानंतर बिरबल म्हणाला. बरोबर आहे महाराज परंतु तुम्हाला जो ही वार्ता सांगणार होता त्याला तुम्ही सजा देणार होतात. म्हणून कोणाला न सांगता ही वार्ता तुमच्या तोंडून तुम्हाला ऐकवायची होती.

महाराजांना आपल्या चुक समजली आणि त्यांनी बिरबल व सखाराम मला माफ केले.

समुद्राचे लग्न: (Short Moral Stories in Marathi for Class 1)

एक दिवशी बिरबलाच्या एका विनोदावर महाराज अकबर रागवले आणि त्याने बिरबलाला राज्य सोडून जाण्यास सांगितले. बिरबल चूपचाप राज्य सोडून गेला काही दिवसानंतर महाराजांना आपल्या चुकीची जाणीव झाली, आणि त्याने बिरबलाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु काही केल्या बिरबल मिळेना तर बिरबलाला परत आणण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली.

त्याच्यामध्ये त्यांनी असा एक प्रश्न विचार्याचा ठरवला की त्याचं उत्तर फक्त बिरबलाला माहित असेल. त्यांनी आपल्या सर्व शेजारील राज्यांमध्ये निमंत्रण पाठवले की आमच्या येथे समुद्राचे लग्न करायचे आहे. तरी तुमच्या येथील नद्यांना आमच्या समुद्राला भेट देण्यासाठी घेऊन या.

असा प्रश्न चे उत्तर फक्त बिरबल देऊ शकतो हे राजांना माहीत होतं. ते उत्तराची प्रतिक्षा करत वाट पाहू लागले. काही दिवस गेले तरीदेखील उत्तर आले नाही किंवा कोणत्याही राज्याकडून काही संदेश आला नाही. राजा अकबर थोडे निराश झाली परंतु त्यांनी अखेरपर्यंत विश्वास सोडला नव्हता. त्यांना माहीत होतं की या प्रश्नाचे उत्तर बिरबलाकडे नक्की येणार.

राजाच्या या प्रश्नावर एका राज्यातून एक उत्तर आले ते आणि ते उत्तर पाहून राजाला विश्वास पटला हे फक्त बिरबल देऊ शकतो. उत्तरामध्ये लिहिले होते ठीक आहे, आम्ही आमच्या राज्याच्या नद्यांना घेऊन समुद्राकडे निघालो आहे. परंतु आम्हाला नेण्यासाठी तुमच्या राज्यातील विहिरी पण आमच्याकडे याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. या उत्तरावर अकबराने लगेच जाऊन बिरबलचा असा शोध घेतला आणि ते त्यांना सुखरूप राज्यात घेऊन आले.

अकबर बिरबल आणि बुद्धी: (Moral Stories in Marathi)

एके दिवशी राजा अकबराची बिरबल सोबत भांडण झाले. अकबराने बिरबलाला महाल सोडून जाण्यासाठी सांगितले. बिरबल देखील राजाची आज्ञेचे पालन करून राज्य सोडून गेला.

काही दिवस निघून गेले त्यानंतर राजाला समजले की काही गोष्टींचे निर्णय घेताना त्याला बिरबलाची गरज पडतेय. त्याची कमी त्याला नेहमी जाणवू लागली. तेव्हा त्याने आपल्या शिपाई पाठवले आणि सांगितले जा कुठे बिरबल असेल त्याला लगेच घेऊन या.

सेवक देखील राजाने दिलेली आज्ञेचे पालन करत बिरबलाला शोधण्यासाठी निघाले. त्यांनी शेजारील गावांमध्ये राज्यामध्ये बिरबलाला खूप शोधले परंतु ते काही सापडले नाही. हताश होऊन सैनिक परत माघारी आले.राजा देखील हताश झाला.

त्याला एक युक्ती सुचली. त्याने शेजारील गावातील मुखियाना बोलावले आणि आदेश काढला की, पुढील एक महिन्यात मला एका मडक्यात बुद्धी भरून ती माझ्यासमोर पेश करावी. तसे न केल्यास तुम्हाला त्याचं मडक्यात सोने चांदी भरून द्यावी लागेल.

सर्व राज्यातील मुखिया चिंताग्रस्त झाले. त्यांनी गावात ग्रामसभा भरवली. त्या सभेला बिरबल देखील वेश बदलून उपस्थित होता. ग्रामसभेत सरपंचाने विषय माडला त्यावर बिरबलाला उपाय सुचला आणीं तो सरपंचाला म्हणाला मी जसे सांगतोय तसे करा.

बिरबलाने एक माठ घेतला आणि तो घेऊन तो शेतामध्ये गेला. तेथे त्याने त्या माठामध्ये एक भोपळा लावला. भोपळा हळूहळू वाढू लागला आणि त्यांनी माठामध्ये आकार घेण्यास सुरू केला. एक वेळ अशी आली की माठामध्ये भोपळा पुरेपूर भरला.

त्यानंतर बिरबलाने त्याचा वेल कापला आणि तो माठ घेऊन तो सरपंचापाशी गेला. तो माठ पूर्णपणे झाकला आणि सांगितले की हा माठ घेऊन तुम्ही राजापाशी जा. त्यांना सांगा की मी यामध्ये बुद्धी भरून आणली आहे आणि तुम्हाला ती माठ ना फोडता काढायची आहे.

सरपंच देखील सांगितल्याप्रमाणे राजापाशी गेला. त्याने त्यांना तो माठ दाखवला. राजाही त्या सरपंचाची बुद्धी पाहून अचंबित झाला. कारण त्याला माहित होते की, अशी बुद्धी फक्त बिरबलाला असू शकते.

त्याने सरपंचाला विचारले की, तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून केले. त्यावर सरपंच म्हणाले आमच्या गावात एक शेतकऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एक मजुराने आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि मी ही तसेच केले.

राजाने लगेचच सेवकांना बोलावून त्या व्यक्तीस घेऊन येण्यास सांगितले पुढे त्यांना समजले की तो बिरबल आहे

शिक्षा: प्रत्येक गोष्टीचे समाधान असते आपल्याला ती फक्त शोधता आली पाहिजे.

अकबर बिरबल आणि अत्तर: (Inspirational Short Moral Stories in Marathi)

एका शाही राजाने राजा अकबरला अत्तर भेट दिले. राजा ते अत्तर घेऊन शाही महालात गेला आणि अत्तर लाऊ लागला. याचवेळी अत्तराचा एक थेंब जमिनीवर पडला आणि उचलण्यासाठी राजा अकबर जमिनीवर बसला.

तेवढ्यात बिरबल तेथे आला.त्याने राजाला असे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. राजा अकबरला देखील कळून चुकले की बिरबल आपण एक थेंब जमिनीवरून उचलण्यासाठी जमिनीवर बसलो हे पाहून हसू लागला.

बिरबलाच्या मनातील राजा अबकराची ही प्रतिमा मिटवण्यासाठी राजा अकबराने एक युक्ती काढली. पुढच्या दिवशी त्याने राज्यात आदेश काढला कि, कोणीहि व्यक्ती महालातून प्रत्येक व्यक्तीला वाटते तेवढे अत्तर ती घेऊन जाऊ शकतो. राज्यातील सर्व प्रजा अत्तर घेण्यासाठी राज्याच्या दरबारी आली आणि अत्तर घेऊन जाऊ लागली.

त्याचवेळी अकबराने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला हे बघ बिरबल मी सर्व राज्याला अत्तर भेट दिले. प्रजा देखील किती खुश आहे. यावरती बिरबल म्हणाला एका थेंबाची तहान हा पूर्ण समुद्र देखील भागवू शकत नाही.

याचा अर्थ तुम्ही एका थेंबासाठी जमिनीवर बसला आता जरी तुम्ही संपूर्ण समुद्र भरून जरी दिला तरी देखील तुमचा स्वभाव बदलणार नाही तो त्या थेंबा सारखाच राहणार आहे.

तात्पर्य: माणसाचा स्वभाव का कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही तो गरीब असो की श्रीमंत स्वभाव हा एक सारखाच राहतो.

राजा अकबर आणि बिरबल यांची कथा

तीन गाढवांची गोष्ट: (Motivational Short Moral Stories in Marathi)

एके दिवशी राजा अकबर त्याची दोन मुले आणि बिरबल असे चौघे मिळून यमुना नदीच्या काठी आंघोळ करण्यासाठी गेले. एकमेकांशी गप्पा मारत ते यमुना पर्यंत कसे पोहोचले हे त्यांना देखील कळाले नाही.

आंघोळ करण्यासाठी दोन्ही मुलांनी आणि राजानी आपले कपडे काढून दे बिरबलाच्या हातामध्ये दिले आणि ते अंघोळ करण्यासाठी यमुना नदीत उतरले. बीचारा बिरबल त्या दोन मुलांचे आणि अकबराचे कपडे घेऊन नदीच्या काठी उभा होता.

तेवढ्यात राजा अकबराला बिरबलाची चेष्टा करण्याचा विचार मनामध्ये आला आणि तो हसत बिरबलाला म्हणाला हे बिरबला तुला आमचे कपडे हातामध्ये उचलून त्रास तर होत असेल. असा त्रास झाला तर काय हरकत नाही कारण तुझ्यावरती एका गाढवाच्या ओझ्याचा एवढा त्रास तर झालाच पाहिजे.

एवढे ऐकल्यानंतर बिरबल शांत बसेल तो बिरबल कसला. त्यात त्याने लगेच राजा अकबराला उत्तर दिले. होय महाराज माझ्यावरती एका गाढवाचा ओझ्याचा त्रास नसून तीन गाढवांची ओझे मी सध्या माझ्या हातामध्ये बाळगत आहे.

हे ऐकल्यानंतर राजा अकबराला हजरजबाबीपणा वापरून दिलेले उत्तर याचा आनंद झाला आणि तो मनातून खुश झाला.

शिक्षा: कधीही कुणाला जीवनात कमी समजू नका कधीही कुणाची विनाकरण मस्करी करू नका.

राजा अकबर, बिरबल, नोकर, आणि चुना: (Akbar Birbal Short Moral Stories in Hindi)

राजा अकबराला आपल्या राज्यामध्ये फिरण्यास खुप आवडत असत. तो नेहमी जेवण झाल्यानंतर आपल्या महालाच्या बाजूने फेरफटका मारत असे.

एके दिवशी असाच फेरफटका मारत असताना त्याला एक भिंत पडलेली दिसली ज्याचे प्लास्टर पूर्णपणे निघाले होते. राजा अकबराने लगेचच आपल्या नोकराला बोलावले. नोकराचे नाव होते रामू इथे आल्यानंतर त्याने रामूला आदेश दिला की, कसलेही परिस्थितीत उद्या सकाळपर्यंत या भिंती ची मरम्मत झाली पाहिजे.

एवढे सांगून राजा निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवणानंतर फेरफटका मारत असताना पुन्हा राजाचे लक्ष त्या भिंतीकडे गेले. भिंतीकडे गेले. राजांना परत तीच भिंत त्याच अवस्थेमध्ये सापडली.

राजा रागवले आणि त्यांनी रामूला बोलवण्यासाठी सांगितले. रामू राजा पुढे आला. राजाने विचारले की, हे काम का नाही केलेस यावरती रामू म्हणाला महाराज कामाच्या गडबडी मध्ये राहून गेले. आज काम नक्की करतो. राजे अधिकच जास्त रागावले.

त्यांनी रामूला शिक्षा देण्याचे ठरवले. राजाने रामूला दोन वाटी चुना घेऊन येण्यासाठी सांगितले. रामू विचारात पडला दोन वाट्या चुना घेऊन राजा काय शिक्षा देणार आहेत. दोन वाटी चुना आणण्यासाठी रामू निघत असताना रस्त्यामध्ये त्याची भेट बिरबलासोबत झाली.

बिरबलाला झालेला प्रसंग सांगितला. बिरबलाने देखील समजले की राजा शिक्षेमध्ये रामूला दोन वाटी पैकी एक वाटी मधील चुना खाण्यासाठी सांगणार आहेत. त्यांनी रामूला बोलावले आणि सांगितले की वाटीमध्ये असा एखादा पदार्थ ठेव जो तू खाऊ शकतील. एका वाटीमध्ये ठरल्याप्रमाणे रामूने दुसरा पदार्थ ठेवला. त्याचा रंग हुबेहूब चुन्या सारखा दिसत होता. चुन्या सारखी वाटी दाखवून राजाला फसवणूक करायची ठरले.

आदेशाप्रमाणे राजाने रामूला शिक्षा दिली आणि दोन वाटीपैकी एक वाटी खाण्यासाठी सांगितली. रामूने दुसरा पदार्थ ठेवला होता ती वाटी निवडली. त्यातील चुना खाल्ला.

एवढे सगळे होत असताना राजा बारकाईने रामू कडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर तो चुना खातोय, अशी कोणतेही हावभाव नव्हते. राजाला थोडा संशय आला परंतु त्याने काही बारकाईने वाट्या तपासल्या नाहीत आणि तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी राजाला वाटले एक वाटी चुना खाल्ल्यामुळे रामूची तब्येत बिघडेल. तो काही दोन ते तीन दिवस कामावर येऊ शकणार नाही. असा त्याला संशय होता परंतु याच्या विपरीत रामू सकाळच्या वेळेस लगेचच कामावर हजर झाला. तो उत्तम रित्या काम करू लागला.

राजाला थोडा संशय आला आपल्या शिक्षेत काहीतरी कमी झाल्याचे त्याला जाणवले. त्यांनी पुन्हा त्याला दोन वाटी चुना घेऊन येण्यास  सांगितले. आता मात्र रामू पहिल्यापेक्षा जास्त घाबरला होता.

आपली चोरी पकडली जाते हे त्याला वाटत होते. यावेळी त्याने पुन्हा एकदा तो बिरबलापाशी पळत गेला. बिरबलला देखील समजले की चोरी करणारा देखील मूर्ख असतो. तेव्हा त्यांनी रामूला दोन्ही वाट्या दुसऱ्या पदार्थाने भरण्यासाठी सांगितल्या.

रामूने देखील बिरबलाचा सल्ला समजून दुसरे दोन पदार्थ चुन्याच्या जागी ठेवले. तो राजापाशी आला. आता तर राजाने दोन्ही वाटी चुना खाण्यासाठी सांगितले. चुना  खात असताना पुन्हा रामूच्या चेहऱ्यावर असे कोणतेही हावभाव दिसत नव्हते. तेव्हा राजा त्याच्या निकट आला त्याने बारकाईने वाट्याचे निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की वाट्यांमध्ये जुन्या ऐवजी दही भरले होते.

रामू आवडीने दही खात होता. राजाला खूप राग आला त्याने तू असे का केलेस हे विचारले. यावर मला हे करण्यासाठी बिरबलाने सांगितले होते असे सांगितले.

तात्पर्य: चोरी किती जरी करत असला तरी ते पचवता आली पाहिजे. चोरी केल्यानंतर काय होईल काही नाही याची पूर्व शक्यता तपासून पाहणे गरजेचे असते.

अपशकुनी: (Short Moral Stories in Marathi For Class 2)

राजा अकबराच्या दरबारातमध्ये भगत नावाचा दरबारी राहत होता. तो स्वतःला अतिशय हुशार समजत होता. परंतु तो अतिशय मूर्ख आणि अंधविश्वास होता.

भगत एक दिवस राजाला असे म्हणाला की, जो कोणी व्यक्ती सकाळी उठून दिवाकर चे तोंड बघत असे त्याचा पूर्ण दिवस वाईट जात असे. सुरुवातीला राजा अकबराला देखील हा मूर्खपणा असल्यास वाटले. भगतला अक्कल शिकवण्यासाठी राजाने त्याला आपल्या दरबारामध्ये बोलावले.

दरबारामध्ये आल्यानंतर न भगतने राजाला सांगितले की दिवाकर असा व्यक्ती आहे, सकाळी उठून त्याने तुम्हाला पाहिले तर तुमचा पूर्ण दिवस खराब जाइल. राजा अकबराने त्याला विस्ताराने सांगण्यासाठी सांगितले. त्यावर भगत म्हणाला, पूर्ण जनतेमध्ये असा समज आहे की जो कोणी दिवाकर चे तोंड बघतो त्याला काही न काही हानी पोहोचते. याच्या मागचे प्रमुख कारण आहे दिवाकर चे अपशकूनी तोंड.

राजा अकबर आला वाटले हा मूर्खपणा काही बडबडत आहे. त्याला असे सांगण्यात आले की तू उद्या सकाळी दिवाकरला घेऊन माझ्या समोर ये. मला भेटण्यासाठी सांग राजा अकबर म्हणाला. मला सकाळी उठून दिवाकर चे तोंड बघायचे आहे. मला पहायचे आहे दिवसभर माझ्या बाबतीत काही घडते.

बादशहाचा आदेश मिळाल्यानंतर दिवाकरला सकाळी उठून बादशहा समोर हजर राहण्याचे आदेश मिळाले. आदेशाप्रमाणे दिवाकर सकाळी उठून बादशहाला भेटण्यासाठी त्याच्या शाही बगीच्यामध्ये गेला.

बादशाची भेट दिवाकरशी शाही बगीच्यामध्ये झाली. भेट झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये बादशाला समजले कि एका गोदामाला आग लागली आहे. त्याच्यानंतर बगीच्यामधून महालाकडे जाताना बादशाह यांचा अपघात झाला याच्यामध्ये त्यांना किरकोळ जखम झाली.

यावर इलाज करण्यासाठी हकीम यांना बोलून त्यांना औषध देण्यात आले. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे बादशाह विचारात पडले. हे आज कशामुळे होत असेल विचार करत असताना भगत येथे आला आणि त्याने बादशहाची विचारपूस केली.

बादशहाने दुपारपर्यंत घडलेला सर्व प्रकार भगतला सांगितला. त्याच्यावरती बघत म्हणाला मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते की, तो अपशकुनी आहे. त्याचे तोंड जर तुम्ही सकाळी बघितले तर तुमचा पूर्ण दिवस संकटानी भरलेला राहील.

एवढे ऐकल्यानंतर राजा अकबराला देखील भगतच्या गोष्टींवर विश्वास पटू लागला. त्याने दिवाकरला बंदी बनवण्यासाठी सैनिक पाठवले दिवकरला बंदी बनवून कारागृहात टाकण्यासाठी सांगितले. सैनिक दिवाकरला घेऊन दरबारात पेश करण्यासाठी जात असताना त्यांची भेट बिरबलची झाली.

बिरबलने घडला प्रकार विचारला. दिवाकरणे घडलेला सर्व प्रकार सांगितला. बिरबल म्हणाला जर राजा अकबराने तुम्हाला बंदी बनवायची आदेश न दिले असता तर मी नक्कीच तुम्हाला सोडू शकलो असतो. परंतु या क्षणाला तुम्हाला राजा समोर हजर होणे गरजेचा आहे.

परंतु अजून काही बिघडलेले नाही मी सांगितलेली गोष्ट जर तुम्ही राजासमोर सांगितली. तर ते तुम्हाला स्वतःहून सोडून देतील. एवढे सांगून बिरबलाने दिवाकर च्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली.

सैनिक दिवाकरला घेऊन राजासमोर हजर झाले. राजाने दिवाकरवरचा मुकदमा चालू केला. अकबर म्हणाला हे साबित झाले आहे की, जो कोणी व्यक्ती तुझे तोंड पाहतो त्याचा पूर्ण दिवस तुझ्या अपशकुनी तोंडामुळे वाईट जातो.

त्याच्यावरती दिवाकर म्हणाला. हे राजा मला माहीत नाही तुम्ही मला ही शिक्षा का देत आहात. जर माझे तोंड पाहील्यामुळे तुम्हाला थोडे नुकसान झाले तरी एवढ्या राजाला एवढे नुकसान हे काहीच नाही. राहिली गोष्ट तुम्हाला शारीरिक अपघात दोन ते तीन दिवसात भरून बरे होतील.

पण हे राजा तुम्ही हा विचार केलात का! माझे तोंड बघण्याने तुम्हाला किंचित भर त्रास झालेला आहात आहे. परंतु मी तुमचे तोंड पाहिल्यामुळे मला आयुष्यभर कारावास भोगावा लागणार आहे. तर मला सांगा राजा यामध्ये जास्त अपशकुनी तोंड कोणाचे आहे. तुमचे आहे की माझी आहे. राजाला आपली चूक समजली आणि त्यालाही हेही देखील समजले ती ही गोष्ट सांगण्यासाठी त्याला बिरबलाने मदत केली आहे.

शिक्षा: अंधविश्वास ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी स्वतःला सुधारावे लागेल.

अकबर बिरबल आणि अंध व्यक्ती (Short Moral Stories in Marathi For Class 3)

एकदा राजा अकबर आणि असा विचार केला की आपल्या राज्यातील सर्व अंध व्यक्तींची मदत केली जाईल. त्यासाठी त्याने राज्यातील सर्व अंध व्यक्तींची सूची बनवण्यासाठी राजा बिरबलाला बोलावले. त्यांनी राजा बिरबलाला सांगितले की, आम्हाला राज्यातील सर्व अंध व्यक्तींची मदत करायची आहे. तरी तुम्ही अंध व्यक्तींची सूची बनवा.

यावरती राजा बिरबल राजाला म्हणाला, आपल्या राज्यातील अंध व्यक्तींची संख्या ही खूप जास्त असल्यामुळे अशी सूची बनवणे शक्य नाही. राजाला बिरबलाचा थोडासा राग आला परंतु त्यांनी त्याला सूची बनवण्यासाठी सांगितले. सूची बनवायची हा विचार करून राजा अकबर बिरबलाला आदेश दिला.

आदेशाचे पालन करण्यासाठी बिरबलाने आपल्या सोबत एक सैनिक घेऊन चारपायी तयार केली. ती शिवण्यासाठी तो भर बाजारात घेऊन गेला. राजा अकबराला न सांगता राजा बिरबल बाजारामध्ये गेले. आणि त्याने तिथे ती चार पाई मांडली आणि तो तिथे विनू लागला.

बिरबल महाराजांना भर बाजारात चारपायी विणताना पाहून तेथील जनता आश्चर्यचकित झाली. प्रत्येकजण त्यांना विचारू लागले कि, महाराज आपण हे काय करत आहात. असे विचारतात महाराज आपल्या बरोबर घेऊन गेलेल्या सैनिकला त्याचे नाव ती त्या यादीमध्ये लिहिण्यासाठी सांगत होते.

असे करत करत ही गोष्ट आगीसारखी पूर्ण राज्यांमध्ये पसरली, प्रत्येकजण येऊन बिरबलला पाहण्यासाठी बाजारामध्ये येऊ लागला. राजाला देखील ही माहिती समजली. तेही आपल्या नवरात्रांपैकी एक बिरबल याला भेटण्यासाठी भर बाजारात आले.

राजादेखील बिरबलाला पाहून म्हणाला राजा बिरबला हे तू काय करत आहात आहेस. हे ऐकून देखील बिरबल थांबला नाही आणि त्यांनी सेवकाला सांगितले सैनिकाला सांगितले की, राजाचे नाव देखील या सूचीमध्ये लिहून टाका.

त्यानंतर राजाने बिरबलला उभे राहण्यासाठी सांगितले. बिरबल उभा राहिला आणि त्यांनी राजाला सूची दिली यामध्ये सर्व अंध व्यक्तींची नावं आहेत आणि अजून अंध व्यक्ती बाकी आहेत महाराज. बिरबल राजाला म्हणाला, हे पहा महाराज आपल्या राज्यातील अंध व्यक्तींची नावे आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात खाली राजाचे नाव होते. स्वतःचे नाव वाचल्यानंतर राजा भडकला, त्याने बिरबलाला विचारलं हे तू काय करत आहेत. मला तर काही समजत नाही.

यावर बिरबल म्हणाला या राज्यातील जनता समोर दिसत असूनही देखील विचारते की मी काय करत आहे. त्यांना समजत नाही का मी चार पाई विनत होतो. याचा अर्थ ते अंध आहेत. राजाला आपली चूक समजली आणि त्याने जी अंध व्यक्तींची यादी बनवायची होती ती रद्द केली.

चोर कसा शोधला (Short Moral Stories in Marathi For Class 4)

एकदा एका शेठच्या हवेलिमधून महत्वाच्या वस्तू चोरीला गेल्या. शेठला त्याच्या नोकरांवर्ती संशय होता. त्याने चारही नोकरांना बोलावले आणि घडलेला प्रकार सांगितला.

चारही नोकर एकत्र आले आणि त्यांना सांगितले की जर तुम्ही तुमची चूक कबूल केली तर मी तुम्हाला माफ करेल. परंतु कोणीही समोर नाही आले. यावरती तो शेठ मदतीसाठी अकबराच्या दरबारात आला. त्याने घडलेला प्रकार सांगितला. अकबराने मदतीसाठी बिरबलाला भेटण्यासाठी सांगितले.

शेठ बिरबलाला भेटला. दोघे मिळून चारही नोकरणापाशी गेले. बिरबलाने चारही नोकरांना वेगवेगळ्या खोलीमध्ये बंद केले आणि म्हणाला
हे पहा मला माहित आहे चोर कोण आहे. तरीपण जर तुम्ही स्वतःहून चोरी कबूल केली तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही. जर तुम्हाला तुमची चोरी कबूल असेल तर त्याने खोलीतून बाहेर यावे.

एवढे बोलून देखील हो कोणताही चोर बाहेर येण्यास तयार नव्हता. तेव्हा बिरबलाने शक्कल लढवली आणि सांगितलं की, मी प्रत्येकाच्या खोलीमध्ये एक जादूची काठी ठेवली आहे. जो कोणी चोर असेल त्याची काठी दोन इंचाने वाढेल आणि तो सकाळी आपल्याला सापडेल.

चारही नोकऱ्यांमध्ये चोर असणाऱ्या नोकर सोडून बाकी 3 नोकर निवांत झोपी गेले. त्यांना माहीत होतं की आपण चोरीच नाही केली तर आपली काठी दोन इंच वाढणार नाही. परंतु चौथा चोर मात्र चिंतेत होता. तो रात्रभर काठी कडे बघत राहिला.

त्याच्या मनामध्ये आले जर आपण अगोदरच काठी दोन इंच ने कमी केली तर आपली वाढलेली काठी हे इतरांना समजणारच नाही. एवढा विचार करून त्याने आपली काठी दोन इंचने कमी केली. सकाळी बिरबल, अकबर आणि शेठ चार चोरांना एकत्र घेऊन त्यांच्या काठ्या त्यांनी एकत्र घेतल्या आणि चोर समोर सापडला.

चोर सापडतात त्याने शेठच्या पायामध्ये आपले डोके ठेवून क्षमायाचना मागितली. शेठने त्याला माफ न करता कोतवालाच्या हवालात देऊन टाकले. त्याने चोरी केलेल्या वस्तू त्याच्याकडून काढून घेण्यात आल्या आणि त्याला शिक्षा सुनावली.

अकबर बिरबल आणि न्हावी: (Short Moral Stories in Marathi For Class 5)

राजा अकबराचा न्हावी बिरबलला कसा त्रास होईल यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. एक दिवशी त्याने बिरबलाला मारण्याची रणनीती बनवली.

नेहमीप्रमाणे एके दिवशी तो राजा अकबराची दाढी करतांना तो राजा अकबराला म्हणाला, राजा या धर्तीवरवरील जीवनानंतर मिळणार्या जीवनावर तुमचा विश्वास आहे का?

राजाने उत्तर दिलं होय नक्कीच या धर्तीवरच्या नंतर मिळनाऱ्या जीवनावर माझा नक्कीच विश्वास आहे. म्हणजेच माझा स्वर्गावर विश्वास आहे.
यावरती न्हावी म्हणाला, महाराज तुम्हाला माहित आहे का तुमचे पूर्वज आत्ता या क्षणाला स्वर्गामध्ये काय करत असतील किंवा तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे का या क्षणाला तुमचे पूर्वज काय करत असतील.

राजा अकबराला देखील वाटले की, आपले पूर्वजाची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याला विचारले की तू स्वर्गाबद्दल आणि पूर्वजांबद्दल कशी माहिती मिळूवू शकतो. यावरती न्हावी म्हणाला की माझ्याकडे एक युक्ती आहे. याचा वापर करून तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकता. परंतु यासाठी एका हुशार व्यक्तीची गरज आहे जो संपूर्ण ज्ञानी आणि हुशार आहे.

राजा म्हणाला असा तर आपल्या राज्यांमध्ये एकच व्यक्ती आहे. जो संपूर्ण ज्ञानी आहे. त्याचे नाव बिरबल आहे. न्हावी मनातल्या मनात खूप झाला. त्याने महाराजांना सांगितले की माझ्याकडे असे ठिकाण आहे जिथून अग्नि दिल्याने समोरचा व्यक्ती स्वर्गात जातो.

स्वर्गातील व्यक्तींची विचारपूस करून माघारी येतो. राजाला न्ह्याव्यावर्ती संशय आला. आणि त्याने सर्व घडलेली सर्व कथा बिरबलाला सांगितली. बिरबल ही स्वतःला अग्नी घेऊन स्वर्गास जाण्यास तयार झाला. परंतु त्यासाठी त्यांनी राजाकडे थोड्या दिवसांचा कालावधी मागितला.

राजाने देखील बिरबलवर विश्वास ठेवून तो नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल असा विचार करून त्याला मुबलक वेळ दिला. या वेळेमध्ये बिरबलाने न्हावी कोणत्या ठिकाणी अग्नी दहन करणार आहे याचा शोध घेतला. त्या ठिकाणी आपल्या सैनिकांच्या मदतीने सुरंग बनवली.

त्याच्यानंतर त्याने राजाला सांगितले की मला दहन होऊन स्वर्गात जाण्यासाठी तयार आहे. त्यादिवशी राजा बिरबल आणि न्हावी  व इतर प्रजा आणि समस्त दरबार मंडळासमोर चितेवर बिरबलाला उभे करून त्याला अग्नी देण्यात आला. परंतु अग्नी देणेच्या अगोदर बिरबल तिथून सुरुंगाच्या मदतिने खाली निसटला.

त्याने स्वतःचा जीव वाचवला. या कालावधीमध्ये पुढील काही दिवस बिरबल स्वतःच्या घरांमध्ये गुपचूप बसून राहिला या काळात बिरबलाच्या विरोधी असणारे मंडळ तसेच बिरबलाच्या विरोधी असणारे लोक अतिशय खूश झाले. ते कोण होते हे राज्याच्या निदर्शनास आले.

काही दिवसांनी बिरबल अचानक एके दिवशी दरबारात हजर झाला. त्याचा अवतार पाहून राजाला देखील आश्चर्य झाले. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःचे केस दाढी केली नव्हती. त्यामुळे तो इतरांच्या ओळखू येत नव्हता.

परंतु स्वतःची ओळख दाखवल्यानंतर त्याने राजाला सांगितले की, मी स्वर्गात तुमच्या पूर्वजांना भेटलो. परंतु त्यांची अवस्था ही माझी आत्ताच अशी अवस्था आहे अशाच प्रकारे झाली आहे. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे विनवणी केली आहे.

पूर्वजांना अशा एका नाव्ह्याची गरज आहे जो त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल. त्यांची दाढी व्यवस्थित करू शकेल. केस कापू शकेल. ते मी जेव्हा खाली येत होतो त्यांनी त्यांनी मला सांगितले अशा एखाद्या माणसाला पाठवा जो आमची ही देखभाल करू शकेल.

यावर राजा अकबराच्या मनामध्ये आले की आपण आपल्या शाही न्हावी पाठवू जेणेकरून आपल्या पूर्वजांची गैरसोय होणार नाही. त्यानंतर त्याने राज्यांमध्ये आदेश काढला की शाही न्हावी जिथे कुठे असेल त्याला लगेचच राजदरबारात हजर करण्यात यावे. नाव्ह्याला ही गोष्ट समजताच त्याला आपले अश्रू अनावर झाली नाहीत आणि त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला.

अंगठीची कथा:

एक दिवस राजा अकबर आणि बिरबल जंगलामध्ये फिरत होते. ते नेहमी एकत्र जंगलामध्ये फिरत असत. फिरत असताना त्यांना जंगलामध्ये एक विहीर दिसली.

त्यांना वाटले आपण स्वतःहून जाऊन बघावे त्या विहिरीमध्ये काय आहे. विहिरी शेजारी गेल्यानंतर त्यांनी आत वाकून बघितले तर त्यांना विहीर रिक्त असल्याचे समजले.

विहीर पूर्णपणे सुकून गेली होती. आतील काही दिसत नव्हते. यावर राजा अकबर असे म्हणाला, यामध्ये काही टाकले तरी ते काढता येऊ शकत नाही. यावर बिरबल म्हणाला, महाराज हे बिलकुल संभव आहे. यामध्ये कोणती गोष्ट पडली तरीही ती काढता येऊ शकते.

एवढे ऐकताच राजा अकबराने लगेचच आपल्या हातामधील अंगठी त्या विहिरीमध्ये टाकून दिली. राजा बिरबलाला म्हणाला, किती वेळ घ्यायचाय तेवढा तू घेऊ शकतो. राज्यातील कोणतीही खजिन्यातील सामग्री घेऊ शकतोस. परंतु ही अंगठी मला काढून दाखवा. मी देखील पाहतो की तुम्ही ही अंगठी कशी काढू शकता.

अकबर आणि बिरबल तेथून निघताना बिरबलाने तेथील गाईचे शेण आत विहिरीमध्ये ढकलून दिले. त्यानंतर ते नगरात परत आले. काही दिवसानंतर राजा अकबर आणि बिरबल पुन्हा त्या ठिकाणी फिरण्यासाठी निघाले.

राजा अकबराने पाहिले की, विहीर पाण्याने भरलेली होती. त्यावरती गाईच्या शेणाचा तुकडा तरंगत होता. राजा अकबराने विचारले ही विहीर तर सुकलेली होती परंतु आज तुडुंब भरलेली आहे.

बिरबलाने विहरितून तो शेणाचा तुकडा काढला तर त्याच्या पाठीमागे अंगठी चिकटली होती. बिरबलाने ती अंगठी काढली आणि धुऊन राजाला दिली. राजाला बिरबलाची ही शक्कल युक्ती खूप आवडली. त्याने ती अंगठी बिरबलाला भेट दिली.

आंब्याचा शौकीन:

राजा अकबर आणि बिरबल दोघे मिळून आंबे खात होते. राजा अकबराला बिरबला सोबत बसून गप्पागोष्टी मारत आंबे खायला खूप आवडत असे. जेव्हा कधी दरबार संपल्यानंतर राजा बिरबलसोबत नेहमी बसत असत. आंब्याच्या काळामध्ये आंबे खाण्याचा आनंद दोघे मिळून घेत असत.

एके दिवशी राजा अकबराला युक्ती सुचली की, बिरबलची आपण चेष्ठा करू. ते दोघी मिळून आंबे खात होते. आंबे खाता-खाता राजा अकबराने आंब्या वरची साल तर खाल्ली पण तू गुठली बिरबलाच्या ठिकाण बाजूने सरकून दिली.

असे करत असताना राजा अकबराने भरपूर आंबे खाल्ले आणि गुठल्या बिरबलाच्या बाजूने सरकवल्या. यावरती बिरबलाला राजा अकबर बिरबलाला म्हणाला तू आंब्याचा एवढा शौकीन असतील असं माहित नव्हतं. तुझे आंबेतर खातोय परंतु माझे देखील आंबे खातोय. बघ किती गुठल्या साठवल्या आहेस.

यावरती राजा अकबराला बिरबल म्हणाला, राजा मला आंबे खायला खूप आवडते परंतु मला आंबे एवढे पण आवडत नाही जेवढे की तुम्हाला आवडतात. हे पहा मी आंबे तर खातोय पण कुठल्या बाजूला काढून ठेवली तुम्ही आंबे खाताना त्याच्या सालीसकट गुठल्या पण खाऊन टाकताय.

राजा मनातल्या मनात हसू लागला आणि बिरबलाच्या उत्तराबद्दल त्यांनी त्याला दाद दिली.

माझा मुलगा सुंदर मुलगा:

राजा अकबरला नेहमी असे वाटत असेल की, त्याचा नातू हा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे. तो त्याला नेहमी नावजत असे. एकदा तर त्याने एका भर सभेमध्ये सांगितले की माझा मुलगा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे. याच्यासारखा सुंदर मुलगा पूर्ण जगामध्ये नाही. पूर्ण मंत्रिमंडळाने राज्याच्या हा मध्ये हा मिळवले, परंतु बिरबल मात्र त्या वेळी उठून उभा राहिला. आणि राजाला म्हणाला महाराज माफ करावे मला नाही वाटत की तुमचा मुलगा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे.

यावरती महाराज रागावले आणि त्यांनी बिरबलाला सांगितले तू हे कशावरून म्हणतोयस की माझा मुलगा जगातील सुंदर मुलगा नाही. तू ते साबित करु शकतोस का? असे म्हणून त्याने बिरबलाला हे साबीत करण्याची संधी दिली. बिरबलाने देखील संधी स्वीकारली आणि तो महाराजांना घेऊन एका वस्ती मध्ये गेला. वस्तीमध्ये खूप मुले खेळत होती. खेळत असताना त्यांच्या चेहऱ्यावर अंगावर धूळ साठली होती. त्यांचे कपडे फाटलेले होते. त्यातील एका मुलाकडे पाहून राजा म्हणाला तु या गलिच्छ वस्ती मध्ये आम्हाला का आणलेला आहेस.

यावरती बिरबल म्हणाला महाराज तो समोर दिसणारा मुलगा बघताय का, तो आहे या जगातील सर्वात सुंदर मुलगा ! यावरती महाराज हसले आणि म्हणाले तुला काय वेड लागल आहे का? या गलिच्छ मुलाला पाहून तू असे म्हणतो आहेस की हा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे.

तितक्यात तिथून एक महिला त्या मुलाला उचलून कडेवर घेते आणि महाराजांना म्हणते. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला गलिच्छ म्हणण्याची. माझ्यासाठी माझा मुलगा हा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहे. त्याची बरोबरी इतर कोणीही करू शकत नाही. एवढेच नाही माझ्या मुला वर माझ्या इतक प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही.

राजाला आपली चूक समजली आणि त्यानंतर सांगितले तू जे सांगत होता ते बरोबर आहे. प्रत्येक आई-वडिलांना, आजी-आजोबांना आपला मुलगा हा जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ मुलगा आहे.

राजा अकबर बिरबल आणि तळहातावरील केस:

राजा अकबर बिरबलला सोबत फिरत होते. अकबराच्या मनामध्ये प्रश्न आला की बिरबलाची आपण चष्मा करूया. यासाठी त्याने बिरबलाला एक प्रश्न विचारला.

हे सांग बिरबल आपल्या तळहातावरती केस का नसतात. एवढा विचार करून बिरबल राजा अकबराकडे पाहू लागला. त्याने राजा अकबराला उत्तर दिले.

हे महाराज तुम्ही आयुष्यभर एवढे दान केले आहे त्यामुळे तुमचे दान करून करून तळ हातावरील केस गेले आहेत. बिरबलाने दिलेल्या उत्तर पाहून राजाने त्याला परत प्रश्न विचारला. हे असेल तर तुझ्या हातावरील हातावरील केस कुठे गेले?

बिरबल देखील हुशार होता आणि त्याने अगोदरच या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये आठवण ठेवले होते. तो म्हणाला, राजा जसे तुमच्याकडे हातावरील केस दान केल्यामुळे गेलेला आहे तसेच माझ्या तळहातावरील केस दान घेतल्यामुळे गेलेले आहेत. उत्तर ऐकून आणि बिरबलाचा हाजिर जवाबपणा पाहून राजा बिरबल खुश झाला.

उत्तम पारितोषिक:

एकदा बिरबलच्या कानावर आले की, गरीब लोकांना नगरातील पहरेदार त्रास देतात. ते सर्व पहरेदार भ्रष्ट असल्याचे गरीब लोकांनी बिरबलाला सांगितले आहे. याची शहानिशा करण्यासाठी बिरबलने वेशभूषा धारण करण्याचे ठरवले.

पेहरेदार भ्रष्ट असल्याचे गरीब लोकांनी बिरबलला सांगितले हे बरोबर आहे कि नाही हे पाहण्यासाठी बिरबलने कवीचा वेश घेतला. तो पेहरेदारासमोर आला.

त्याने सांगितले की मी खूप दुरून आलो आहे. मला महाराजांना भेटायचे आहे. त्यावर ते पेहरेदार म्हणाले तुला असे महाराजांना भेटता येणार नाही. महाराज सध्या कामात आहेत.

यावरती कवीच्या रूपात असलेला बिरबल म्हणाला, मी खूप दुरून आलो आहे. मला कसल्याही परिस्थितीत महाराजांना भेटून जायचे आहे. त्यांना माझी कविता ऐकवायची आहे.

एवढे ऐकल्यानंतर पेहरेदार म्हणाली ठीक आहे. आम्ही तुला आत सोडू परंतु तुला जे काही बक्षीस मिळेल त्यातील निम्मे बक्षीस आम्हाला द्यावे लागेल.

कवी तयार झाला आणि तो महाराजांपाशी आला. त्यांनी आपली कविता महाराजांना ऐकवली. महाराज देखील खुश झाले. महाराजांनी कवीला विचारले बोल तुला कोणते बक्षीस देऊ. यावर तो कवी म्हणाला महाराज मला 100 चाबकाचे फटके हवे आहेत.

महाराजांना आश्चर्य झाली कि, कवी असं का म्हणतो आहे. यावर महाराजांनी कवीला विचारले, एवढी सुंदर कविता म्हणून मी देखील तू असे बक्षीस का मागतो आहे.

त्यावर तो कवींच्या रूपात असलेला बिरबल म्हणाला, महाराज मी जे बक्षीस मागत आहे त्यात माझ्या इतकाच वाटा इतर दुसऱ्या दोघांचा वाटा आहे.

त्यामुळे त्यांनाही तेच बक्षीस मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. महाराजांनी कुतुहलाने विचारले असे बक्षीस मागणारे तुझे जोडीदार आहे तरी कोण. त्यावरती बिरबल म्हणाला, महाराज मला तुमच्या समोर येण्यासाठी माझे निम्मे बक्षीस तुमच्या पेहरेदार यांनी मागितले होते.

मी जर त्यांना बक्षीस दिले नाही तर ते मला जाऊन देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना ते बक्षीस द्यावे आणि माझा जीव वाचवा. यावरती महाराजांनी लगेच पेहरेदाराना समोर येण्याची आज्ञा केली. राजाने त्यांना शिक्षा म्हणून कोडे दिले.

महाराजांना कवीची युक्ती आवडली आणि त्यांनी विचारले तुझे नाव काय आहे. यावरती वेशभूषेत असलेला बिरबल आपल्या खर्या रुपात बाहेर आला.

राजा अकबर बिरबल आणि लठ्ठपणा:

एकदा राजा अकबर आणि बिरबल बसले होते. दोघांची खूप चांगली चर्चा चालू होती. यातच बिरबल मुद्दामून अकबराला म्हणाले. राजे मला माफ करा परंतु दिवसेंदिवस तुम्ही खूप मोठे होत आहात.

तुमचा लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत आहे. यावरती राजा अकबर बिरबलला म्हणाला. काहीपण हा बिरबल, हा लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण आहे आपल्या रसोई मधील पंचपक्वान आणि त्यासाठी वापरले जाणारे तेल.

या दोन्ही गोष्टींमुळे हा लठ्ठपणा वाढत आहे, असे मला वाटते. परंतु या वरती बिरबल अकबरला म्हणाला. लठ्ठपणा वाढण्याची कारण तुमचे पंचपक्वान नाही तर तुमच्या मनात कोणत्या गोष्टीची चिंताच उरली नाही. तुमच्या मनामध्ये चिंता राहिलीच नाही महाराज.

अकबराला बिरबलचे म्हणणे अजिबात पटले नाही. त्याने बिरबलला सांगितले तू जे म्हणतोयस ते मला पटवून दे. यावर बिरबल म्हणाला मला थोडा वेळ द्या मी तुम्हाला ही गोष्ट पटवून देतो.

पुढच्या दिवशी बिरबलने बाजारामधून एक बकरी विकत घेतली. ती बकरी राजा अकबराला दाखवून तो त्याच्या घरी घेऊन गेला. आपल्या सेवकांना त्यांनी सांगितले की या बकरीची दररोज चांगली काळजी घ्या आणि हिला चांगले जेवण द्या.

बिरबलने राजाला पहिलेच सांगितले होते कि, बकरीला चांगले जीवन देण्यात येणार आहे. सेवकांनी देखील तसेच केले. बकरीला दररोज चांगले जेवण देण्यात आले.

पुढील दोन महिने असेच गेले बकरीला चांगले जेवण देण्यात आले. एके दिवशी बादशाह अकबर स्वतःहून बकरीचे निरीक्षण करण्यासाठी बिरबलाच्या घरी गेला. बकरीला पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले बकरीची प्रकृती खूप सुधारलेली असेल. परंतु त्याच्या उलट दिसत होते.

बकरी अजूनच कमजोर झालेली होती. राजाने बिरबलला विचारले या बकरीला जेवण देण्यात कोणती लापरवाही झाली आहे का? यावर बिरबलाने उत्तर दिले नाही महाराज, या बकरीला दररोज खानपान व्यवस्थित देण्यात आलेले आहे.

राजाने त्याला विचारले मग ही बकरी का सुधरत नाही. यावर बिरबलाने उत्तर दिले या बकरीचं न सुधारण्या मागचे कारण आहे या बकरीची  चिंता कारण या बकरीला जिथे ठेवण्यात आलेले होते त्याच्या शेजारीच पिंजर्यात मी वाघाला ठेवले होते.

बकरीला कितीहि शाहि जेवण दिले तरी दररोज तिचे दर्शन वाघाची होत होते. या भीतीने किं वाघ आपल्याला दररोज बघतोय आणि तो आपल्याला कधीही खाऊ शकतो.

त्या बकरीला शाही जेवण दिले तरी या चिंतेमुळे तिला ते मानवत नाही. तिची अवस्था तुम्ही आज बघतच आहात. हे पाहून राजाला ही देखील समजले की आपण चिंताग्रस्त नसल्यामुळे आपल्याला लठ्ठपणा येत आहे. बिरबलने हे त्याला निश्चित पटवून दिले.

मला खात्री आहे कि तुम्हाला Akbar Birbal Story in Marathi with Moral कथा नक्की आवडल्या असतील. अश्याच कथा जाणून घेण्यासाठी आमच्या website ला अवश्य भेट द्या.

९९% लोग नहीं जानते राम नवमी के बारे में ये बाते